DC vs MI Dream 11 Prediction: काय तुम्ही ड्रीम 11 गेम खेळतात? मग दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात 'हे' खेळाडू बदलू शकतात तुमचे नशीब
दोन्ही संघ या हंगामातील चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत
इंडियन प्रिमियर लीगच्या इतिहासात सर्वात यशस्वी आणि पाच वेळा आयपीएलचे खिताब जिंकलेला मुंबई इंडियन्सचा संघ आज (20 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दोन्ही संघ या हंगामातील चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या हंगामात दोन्ही संघाने प्रत्येकी 3 सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यान विजय मिळवला आहे. तर, एकात पराभूत झाले आहेत. परंतु, रन रेटचा जोरावर दिल्ली गुणतालिकेत तिसऱ्या तर, मुंबई चौथ्या स्थानावर आहे. सध्या अनेकांमध्ये ड्रीम 11 गेमचे वेड पाहायला मिळत आहे. परंतु, या गेममध्ये चांगल्या खेळाडूंची निवड करता न आल्याने अनेकजण निराश होतात. यामुळे आजच्या सामन्यात कोणत्या खेळाडूंची निवड करणे योग्य ठरेल? यासाठी खालील माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
मुंबईचे कर्णधार रोहित शर्माला या हंगामात चांगली सुरुवात मिळाली आहे. तसेच सुर्यकुमार यादवही चांगली कामगिरी बजावत आहे. चेन्नईची खेळपट्टीवर फलंदाजी कठीण असते. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही उत्कृष्ट गोलंदाजीच्या जीवावर चाहत्यांची मन जिंकली आहेत. गेल्या सामन्यात कमी धावसंख्या असतानाही विरोधी टीमला रोखण्यात मुंबई इंडियन्सला यश आले होते. यावेळी बुमराहसह ट्रेन्ट बोल्टनेही चांगली गोलंदाजी केली होती. दुसरीकडे, दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन फॉर्ममध्ये आहे. त्याने 3 सामन्यात 2 अर्धशतकांसह 186 धावा केल्या आहेत. धवन आणि पृथ्वी शॉने दोन सामन्यात दिल्लीच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. हे देखील वाचा- हृदयाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर Muttiah Muralitharan यांना लवकरच रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
ड्रीम 11 संघ-
यष्टीरक्षक: ऋषभ पंत, क्विटन डी कॉक
फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन (उपकर्णधार), सुर्यकुमार यादव
अष्टपैलू: क्रिस वोक्स
गोलंदाज: जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, राहुल चाहर, आवेश खान,
संघ-
मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, अॅडम मिलने, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पियुष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, ख्रिस लिन, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, जेम्स नीशम, अनमोलप्रीतसिंग, अनुकुल रॉय, मोहसिन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन, युधवीर सिंग
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, ख्रिस वॉक्स, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, अवेश खान, लुकमान मेरीवाला, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा , उमेश यादव, अनिरुद्ध जोशी, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, शिमरॉन हेटमीयर, प्रवीण दुबे, ऐनरिच नॉर्टजे, विष्णू विनोद, मणिमरण सिद्धार्थ, शम्स मुलाणी, रिपाल पटेल