Team India ला 'या' वर्षी मिळू शकतो नवा प्रशिक्षक? 'हा' अनुभवी खेळाडू घेवु शकतो Rahul Dravid ची जागा

द्रविडची टी-20 विश्वचषक 2022 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी टीम इंडियाचे (Team India) प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यंदाच्या विश्वचषकानंतर भारतीय संघाला नव्या प्रशिक्षकाची गरज भासणार आहे.

Rahul Dravid And Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

Team India: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत भारतीय संघ बाहेर पडला तेव्हा द्रविडने ही जबाबदारी स्वीकारली. द्रविडची टी-20 विश्वचषक 2022 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी टीम इंडियाचे (Team India) प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यंदाच्या विश्वचषकानंतर भारतीय संघाला नव्या प्रशिक्षकाची गरज भासणार आहे. पण प्रश्न असा आहे की, द्रविडनंतर या पदाची धुरा कोण घेणार? बीसीसआयने (BCCI) राहुल द्रविडचा करार संपल्यानंतर वीवीस लक्ष्मण (VVS Laxman) हे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असु शकतात जे सध्या 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत जबाबदारी संभाळू शकतात.

IANS वर प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की द्रविडने पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढीचा विचार करू नये, सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये क्रिकेटचे प्रमुख वीवीस लक्ष्मण यांना पुढील प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. द्रविडच्या अनुपस्थितीत 48 वर्षीय लक्ष्मण यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आयर्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 आणि जून 2022 मध्ये झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी संघासोबत होते. (हे देखील वाचा: Virat-Sachin Record: कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा 'विराट' विक्रम, 2023 मध्ये बनू शकतो शतकांचा बादशाह)

लक्ष्मण यांनी यापूर्वीच सांभाळली आहे जबाबदारी 

युएई मध्ये टी-20 एशिया कप च्या 2022 च्या मोसमासाठी देखील ते भारतीय संघासोबत होते जेव्हा द्रविडची कोरोनाव्हायरसची चाचणी सकारात्मक झाली होती. लवकरच, ते न्यूझीलंडला त्यांच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यासाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गेले. टी-20 विश्वचषक नोव्हेंबर 2022 मध्ये संपला. NCA मधील खेळाडूंच्या पुढील पिढीला तयार करण्याव्यतिरिक्त, लक्ष्मणने 2022 च्या यशस्वी विश्वचषकासाठी भारतीय अंडर-19 संघासोबत प्रवास केला आणि वेस्ट इंडिजमधील त्यांच्या मोहिमेदरम्यान युवा संघासोबत अतिशय सक्रिय भूमिका बजावली.

द्रविडने नोव्हेंबर 2021 मध्ये रवी शास्त्री यांच्याकडून मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भारतीय संघासोबत काम केले आहे. ते टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाले आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि एकदिवसीय मालिका आणि बर्मिंगहॅममधील पाचव्या कसोटीत इंग्लंडकडून पराभूत होण्याव्यतिरिक्त 2022 टी-20 आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now