Cameron Green ruled out of Border-Gavaskar Trophy: भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; कॅमेरून ग्रीन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून बाहेर, नेमक कारण काय?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

Photo Credit- X

IND vs AUS Cameron Green rulled out Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जाणार आहे. 2 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. पण याआधीच ऑस्ट्रेलियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. कॅमेरून ग्रीनने (Cameron Green) यापूर्वी चांगली कामगिरी करत संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले होते. ज्यामुळे कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा:Happy Birthday Gautam Gambhir: गौतम गंभीर 43 वा वाढदिवस, बीसीसीआयकडून पोस्टद्वारे वाढदिवसाच्या खास शुभेच्छा )

ग्रीन हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि मधल्या फळीत दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव नक्की भासेल. ग्रीनला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन आणि भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सारखीच दुखापत झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापत

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली होती. यानंतर, स्कॅनमध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आणि आता त्याने पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय निवडला आहे. शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी त्याला किमान 6 महिने लागतील. याच कारणामुळे तो भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानच्या भूमीवर होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अहवालानुसार तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.

कॅमेरून ग्रीनची कारकीर्द

कॅमेरून ग्रीनने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पहिली कसोटी खेळली. तेव्हापासून तो संघाचा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 28 कसोटी सामन्यांमध्ये 1377 धावा आणि 35 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन शतके आणि 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी 28 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now