Jasprit Bumrah New Record: पहिल्या मालिकेत कर्णधारपद भूषवताच जसप्रीत बुमराहने केला मोठा पराक्रम, रोहित-हार्दिकची केली बरोबरी
या कारणामुळे जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारताने मालिका 2-0 ने जिंकली. मालिका जिंकताच बुमराहने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. सतत पाऊस पडत होता, त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला, पण टीम इंडियाने (Team India) मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. या कारणामुळे जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारताने मालिका 2-0 ने जिंकली. मालिका जिंकताच बुमराहने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. (हे देखील वाचा: Team India Fitness Test: आशिया चषकापूर्वी खेळाडूंच्या फिटनेसवर बीसीसीआयचा भर, विराट, रोहितसह सर्वांची होणार विशेष चाचणी)
बुमराहने केली मोठी कामगिरी
कर्णधार जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात 4 बळी घेतले होते आणि ते खूपच किफायतशीर होते. याच कारणामुळे त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार देण्यात आला. बुमराहचा हा टी-20 आंतरराष्ट्रीय मधील दुसरा 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार आहे. यासह त्याने रोहित शर्मा, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांची बरोबरी केली आहे. या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दोन 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कारही जिंकले आहेत.
भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळवणारे खेळाडू:
- विराट कोहली - 7 पुरस्कार
- सूर्यकुमार यादव - 3 पुरस्कार
- भुवनेश्वर कुमार - 3 पुरस्कार
- जसप्रीत बुमराह-2 पुरस्कार
- युझवेंद्र चहल-2 पुरस्कार
- रोहित शर्मा-2 पुरस्कार
- हार्दिक पांड्या-2 पुरस्कार
- अक्षर पटेल-2 पुरस्कार
अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा भारतीय
जसप्रीत बुमराह हा टी-20 मध्ये कर्णधार म्हणून प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी हा पराक्रम केला आहे. कोहलीने कर्णधार म्हणून टी-20 मध्ये तीन वेळा ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकला आहे.
टी-20 मध्ये प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारे भारतीय कर्णधार:
- सुरेश रैना विरुद्ध झिम्बाब्वे (2010)
- विराट कोहली विरुद्ध श्रीलंका (2017)
- विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज (2019)
- विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (2010)
- रोहित शर्मा विरुद्ध न्यूझीलंड (2010)
- हार्दिक पांड्या विरुद्ध न्यूझीलंड (2023)
- जसप्रीत बुमराह विरुद्ध आयर्लंड (2023)