Budget 2019: खेलो इंडिया योजने अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळाची रचना केली जाईल, अर्थमंत्री निर्मला सीतारमन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या 'पूर्ण अर्थसंकल्पात' सीतारामन यांनी सर्व स्तरांवर खेळाच्या विकासासाठी खेळाच्या विकासासाठी खेलो भारत योजनेअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sithraman) संसदेत 2019 साथीचे अर्थसंकल्प (Budget) सादर करत आहे. यात सीतारामन यांनी काही नवीन योजनांची घोषणा केली आहे. आज सादर केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 'पूर्ण अर्थसंकल्पात' सीतारामन यांनी सर्व स्तरांवर खेळाच्या विकासासाठी खेळाच्या विकासासाठी खेलो भारत (Khelo India) योजने अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळ (National Sports Education Board) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
क्रीडा अर्थसंकल्प सांगताना सीतारमण म्हणाल्या, "पाच वर्षांपूर्वी जगातील 200 टॉप विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नव्हतं, आपण यावर काम केलं, आता आपल्या तीन संस्था यामध्ये आहेत. विदेशी मुलांना भारतात चांगले शिक्षण घेता यावं यासाठी स्टडी इन इंडिया आणणार. खेलो भारत योजनेअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळाचे निर्माण केले जाईल. ऑनलाइन कोर्सेसना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार."
दरम्यान, अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अर्थमंत्री म्हणाल्या,"मागील पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं. देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचं ध्येय गाठणार आहे. घर आणि शौचालयांची व्यवस्था करुन महिलांचा सन्मान वाढवला. आज भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर आहे. पाच वर्षांपूर्वी आपण 11व्या क्रमांकावर होतो."