IPL Auction 2025 Live

कोविड-19 ची लागण झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्याबद्दल गौतम गंभीर याने केले 'हे' वक्तव्य

त्यामुळे अनेक मान्यवर, सेलिब्रिटींसह सामान्य व्यक्तींना कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. कालच पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

Gautam Gambhir & Shahid Afridi (Photo Credits: PTI)

सध्या सर्व जगभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) प्रस्थ आहे. त्यामुळे अनेक मान्यवर, सेलिब्रिटींसह सामान्य व्यक्तींना कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. कालच पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आणि भारतीय जनता पार्टीचा (Bharatiya Janata Party) नेता गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने 'सलाम क्रिकेट 2020' च्या मंचावर आपले मत मांडले. यावेळी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, "कोणलाही या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये. शाहिद आफ्रिदीसोबत माझे मतभेद जरुर आहेत. परंतु, तो लवकरात लवकर ठीक व्हावा अशीच मी प्रार्थना करेन."

कोरना व्हायरसची लागण झाल्याची माहिती आफ्रीदीने स्वतः ट्विट करत चाहत्यांसोबत शेअर केली. तसंच आपल्या स्वास्थासाठी प्रार्थना करण्याची विनंतीही त्याने चाहत्यांना केली आहे. विशेष म्हणजे शाहिद आफ्रिदी आपल्या फाऊंडेशनतर्फे कोरोनाग्रस्तांना मदत करत होता. (Shahid Afridi Tests Positive: शाहीद आफ्रिदी याला कोरोनाची लागण; ट्विट करून फॅन्सना केली आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती)

कोरोनाची लागण झाल्याची माहिती देताना शाहिद आफ्रिदी याने ट्विटमध्ये लिहिले, "मला गुरुवारपासून अस्वस्थ वाटत आहे. माझे अंग खूप दुखत होते. त्यामुळे मी चाचणी केली आणि दुर्दैवाने ती पॉझिटीव्ह आली. लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा."

शाहिद आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी 27 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 48 इनिंग्समध्ये त्याने 1716 रन्स केले आहेत. याशिवाय तो 398 एकदिवसीय सामने खेळला असून 369 इनिंग्समध्ये 8064 धावा केल्या असून 99 T20 सामन्यातील 91 इनिंग्समध्ये 1416 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये 48, वनडे मध्ये 395 आणि T20 मध्ये 98 विकेट्स घेतल्या आहेत.