Fan Shaves Mustache Over Bet On Rohit Sharma: बापरे! रोहित शर्मावरुन पैज लावणे चाहत्याला पडले महागात, काढावी लागली अर्धी मिशी, पहा काय आहे प्रकरण
रोहितवर लावलेली पैज हरल्यामुळे त्या व्यक्तीने आपले शब्द पाळले आणि आपली अर्धी मिशी काढली ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरजार चर्चा सुरु आहे.
क्रिकेट हा भारतातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा खेळ आहे आणि खेळाचे चाहते खेळ व खेळाडूंवरील त्यांचे प्रेम सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात. अशाच एका चाहत्याने ट्विटरवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) तिसऱ्या सिडनी टेस्ट (Sydney Test) सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान हल्ल्याविरुद्ध भारताचा (India) रोहित शर्मा (Rohit Sharma) 30 चेंडूंपेक्षा जास्त काळ टिकला तर तो आपल्या अर्ध्या मिश्या काढेल असे वचन दिले. आयपीएलमध्ये हॅमस्ट्रिंग दुखापत झालेल्या रोहितने तिसऱ्या सिडनी येथील कसोटी सामन्यातून मैदानावर कमबॅक केलं आणि पहिल्या डावात 26 धावांची खेळी केली. पुनरागमन सामन्यात रोहितवर लावलेली पैज हरल्यामुळे त्या व्यक्तीने आपले शब्द पाळले आणि आपली अर्धी मिशी काढली ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरजार चर्चा सुरु आहे. अजय नावाच्या या व्यतीचा अर्ध्या मिशीसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी टेस्टमध्ये दोन खेळाडूंचे डेब्यू, पहा सामन्याच्या पहिल्या दिवशी बनलेले प्रमुख रिकॉर्ड)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सिडनी कसोटी सामन्याआधी भूषण कदम अशा एका क्रीडा चाहत्याने आपल्या ट्विटवर रोहितला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा? असा प्रश्न विचाराला होता. या प्रश्नावर @Ajay81592669 या युजरने ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक ओव्हर खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो,’ अशी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं. त्यानंतर सिडनी टेस्टच्या पहिल्या डावात रोहितने 77 चेंडू खेळले त्यानंतर यूजर्सने अजयला त्याच्या वचनाची आठवण करून दिली. अजयने देखील आपला शब्द पाळला आणि खरोखर आपली अर्धी मिशी काढली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पहा हा फोटो:
दरम्यान, रोहितच्या पहिल्या डावातील खेळीबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया ओपनरने आपल्या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकार मारले. आपल्या पहिल्या कमबॅक सामन्यात रोहित मोठा डाव खेळू शकला नसला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने दुर्मिळ कामगिरीची नोंद केली. कांगारू संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांची शंभरी पूर्ण करणारा रोहित पहिलाच फलंदाज ठरला. दुसरीकडे, सिडनी कसोटी सामन्यात यजमान संघाने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया 244 धावांपर्यंतच मजल मारू शकली.