Rohit Sharma Set to Join Indian Team: पर्थ कसोटीपूर्वी भारतासाठी मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' दिवशी संघात होणार सामील- रिपोर्ट

तर रोहित आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी भारतातच राहिला. रोहितला 15 नोव्हेंबरला मुलगा झाला. तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

Rohit Sharma (Photo Credit - X)

Border-GavaskarTrophy 2024-25: भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तो 24 नोव्हेंबरला पर्थमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. म्हणजेच पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी तो संघात दाखल होईल. रोहित नुकताच दुस-यांदा वडील झाला आहे आणि त्यामुळे तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. भारतीय संघ तीन भागात ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. 9 आणि 11 नोव्हेंबरला खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. तर रोहित आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी भारतातच राहिला. रोहितला 15 नोव्हेंबरला मुलगा झाला. तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

रोहित रविवारी संघात होणार सामील

22 नोव्हेंबरपासून मालिकेतील पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वीच तो ऑस्ट्रेलियाला पोहोचेल, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जात होता. पण आता तसे राहिले नाही. क्रिकेट वेबसाईट क्रिकबझने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत रोहित रविवारी संघात सामील होणार असल्याचे वृत्त दिले आहे. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah VS Pat Cummins: जसप्रीत बुमराह विरुद्ध पॅट कमिन्स, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोण सरस? वाचा आकडेवारी)

पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बुमराह म्हणाला की, मी यापूर्वी रोहितशी बोललो होतो. पण ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर लगेचच त्याला कर्णधारपदाबद्दल स्पष्टता आली.

मोहम्मद शमी लवकरच संघात होणार सामील

जसप्रीत बुमराहने असेही सांगितले की मोहम्मद शमी लवकरच संघात सामील होऊ शकतो. तो म्हणाला, 'शमी भाईने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. आणि अर्थातच तो आमच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. व्यवस्थापनही त्याच्यावर लक्ष ठेवेल, असा मला विश्वास आहे. आशा आहे की गोष्टी ठीक असतील आणि तुम्ही त्या इथेही पाहू शकता.