T20 World Cup 2022: आयसीसीचा मोठा निर्णय, अंतिम आणि उपांत्य फेरीसाठी या नियमात केले बदल
मात्र, आतापर्यंत केवळ न्यूझीलंडचा संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. इतर कोणते तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, हे सर्व संघांचा सामना पूर्ण झाल्यानंतरच कळेल.
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकाचा (T20 WC 2022) थरार शिगेला पोहोचला आहे. सध्या सर्व संघांमध्ये सुपर-12 सामना खेळला जात आहे. दोन्ही गटातील 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र, आतापर्यंत केवळ न्यूझीलंडचा संघच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. इतर कोणते तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, हे सर्व संघांचा सामना पूर्ण झाल्यानंतरच कळेल. दरम्यान, आयसीसीने या T20 वर्ल्डच्या अंतिम आणि उपांत्य फेरीच्या नियमांमध्ये (ICC Change The Rule) बदल केले आहेत. या स्पर्धेत पूर्वी असे असायचे की जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामन्याची पूर्ण षटके झाली नाहीत तर दोन्ही संघ 5-5 षटके खेळायचे आणि नंतर डकवर्थ लुईसचा नियम लागू केला जायचा, पण आता आयसीसीने हा नियम बदलला आहे. आयसीसीने जाहीर केले आहे की आता किमान दोन्ही संघ सामन्यात 10-10 षटके खेळतील, तरच डकवर्थ लुईस नियम लागू केला जाईल.
टी-20 विश्वचषक 2022 मधील अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत आणि दोन्ही संघांना 1-1 गुण मिळत असे. पण आता आयसीसीने नियम बदलुन 10 षटकांच्या सामन्यांनंतरच डकवर्थ-लुईस नियम लागू केला आहे. एकदा नाणेफेक झाल्यानंतर कोणताही देश आपल्या संघात कोणताही बदल करू शकत नाही. जगात कुठेही अंतिम आणि उपांत्य सामना पावसामुळे थांबेल, तर सामना राखीव दिवशी सुरू होईल. याशिवाय उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशीही खेळला गेला नाही, तर गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल. (हे देखील वाचा: AUS vs AFG, Full Match Highlights: रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा केला चार धावांनी पराभव, पहा हायलाइट्स)
यावेळी आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. T20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे खेळवला जाईल तर दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी ऍडलेड ओव्हल येथे खेळवला जाईल. 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये अंतिम सामना होणार आहे. हे सर्व भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून असतील.