IND vs NZ T20I: भुवनेश्वर कुमार विश्वविक्रम करण्यापासून अवघ्या 4 विकेट दूर, जाणुन घ्या काय आहे तो रेकाॅर्ड

या संघात भुवनेश्वर कुमारचाही (Bhuvneshwar Kumar) समावेश आहे. भुवनेश्वर कुमारला या सामन्यात विश्वविक्रम करण्याची मोठी संधी आहे.

Bhuvneshwer Kumar (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला तेथे तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना शुक्रवार 18 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात भुवनेश्वर कुमारचाही (Bhuvneshwar Kumar) समावेश आहे. भुवनेश्वर कुमारला या सामन्यात विश्वविक्रम करण्याची मोठी संधी आहे. या संपूर्ण मालिकेत 4 विकेट घेतल्यावरच भुवनेश्वर हा विक्रम आपल्या नावावर करेल.

काय आहे तो रेकाॅर्ड जाणुन घ्या

खरं तर, या मालिकेत भुवनेश्वर कुमारने 4 विकेट घेतल्यास, तो आंतरराष्ट्रीय टी-20 कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत पुढे जाईल. भुवीने यावर्षी भारतासाठी एकूण 30 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 7 च्या इकॉनॉमीसह 36 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वरने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चार विकेट घेतल्यास एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो आयर्लंडच्या जोशुआ लिटलला मागे टाकेल. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या एका कॅलेंडर वर्षात 39 विकेट घेतल्या आहेत. हा विक्रम करण्यासाठी त्याने केवळ 26 सामने घेतले आहेत. भुवनेश्वर कुमार विक्रम मोडण्यापासून फक्त 4 विकेट दूर आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारताचा टी-20 संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडचा टी-20 संघ: केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.