BCCI Apex Council Meeting: शुक्रवारी बीसीसीआयची मोठी बैठक; IPL, सुधारित एफटीपीसह 11 प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अ‍ॅपेक्स कौन्सिलला (BCCI Apex Council) या मोसमातील उर्वरित कालावधीसाठी सुधारित आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका अंतिम करताना एका आव्हानाला समोर जावे लागणार आहे. कोविड-19 कारणास्तव क्रिकेटचे कामकाज ठप्प झाल्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका एकतर रद्द केली गेली किंवा पुन्हा पुढे ढकलण्यात अली. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) आयोजित करण्याच्या ब्ल्यू प्रिंटवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची अपेक्स कौन्सिलची शुक्रवारी व्हर्चुअल बैठक होणार आहे. PTI च्या ताब्यात असलेल्या 11 कलमी अजेंड्यामध्ये देशांतर्गत क्रिकेट (Domestic Calendar) सीझनवर होणारी चर्चा आहे. देशात वेगाने वाढणार्‍या कोविड-19 प्रकरणात झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. (IPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 चे सप्टेंबर महिन्यात आयोजन करण्यासाठी UAE सज्ज, फ्रेंचायझींनी दिला ग्रीन सिग्नल)

तिसरा मुद्दा म्हणजे पुरूष संघाच्या भावी दौऱ्याच्या वेळापत्रकात (FTP) बदल करणे म्हणजे तीन मालिका (श्रीलंका आणि झिम्बाब्वेचा मर्यादित षटकांचा दौरा, इंग्लंडविरुद्ध मायदेश मालिका) आधीच रद्द केली गेली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोरोना संकटामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलवरही परिषद चर्चा करणार आहे. “अर्थातच, सर्व पर्यायांवर विचार करणे आवश्यक आहे. पहिला पर्याय भारत आहे परंतु परिस्थिती कशी असेल हे आपण सांगू शकत नाही. साहजिकच युएई आणि श्रीलंका आहेत पण आयपीएल बाहेर आणल्यामुळे खर्च वाढेल. मला वाटते की अध्यक्षांनी नुकतेच ते देखील सांगितले होते,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर PTI ला सांगितले.

येत्या सोमवारी आयसीसी बोर्डाची बैठक होणार असल्याने 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सरकारकडून कर सूट प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा मुद्दाही अजेंडावर आहे. केंद्र सरकारकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी बीसीसीआयला डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जोपर्यंत भारताच्या एफटीपीचा प्रश्न आहे, सप्टेंबरमध्ये होणारी इंग्लंडविरुद्धमर्यादित ओव्हरची मालिका फेब्रुवारीमध्ये कसोटी मालिकेनंतर पुन्हा निश्चित केली जाऊ शकते. श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या पुढे ढकललेल्या व्हाईट-बॉल टूर्सचे वेळापत्रकही पुन्हा आखणे आवश्यक आहे. Nike चा करार संपुष्टात आल्याने आणखी एक मोठी समस्या परिधान प्रायोजकत्व असेल.

असा असेल बीसीसीआयच्या शुक्रवारच्या बैठकीचा अजेंडा -

1. आयपीएल

2. घरगुती क्रिकेटचे वेळापत्रक

3. फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडच्या मुख्य मालिकेचे एफटीपी पुन्हा आखणे

4. भारतात टी -20 विश्वचषक आयोजित करण्यासाठी कर सूट प्रमाणपत्र अनिवार्य आहे

5. बेंगलुरुमध्ये एनसीए सुविधा

6. बीसीसीआय आणि आयपीएल डिजिटल प्लॅटफॉर्मवर कराराचा विस्तार

7. बिहार क्रिकेट असोसिएशनचा प्रशासकीय गोंधळ

8. बीसीसीआयमध्ये नवीन कर्मचारी नेमणूक

9. राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सीईओ नेमण्याची प्रक्रिया

10. पूर्वोत्तर राज्यांना देयके

11. कपड्यांच्या भागीदारीसाठी निविदाबाबत चर्चा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now