BCCI SGM Agenda: सौरव गांगुलीच्या नेतृत्वात शनिवारी पार पडणार बैठक; T20 वर्ल्ड कप समवेत तीन महत्वपूर्ण निर्णयांच्या घोषणेची शक्यता

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) युएईमध्ये निलंबित इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यावर 29 मे रोजी ऑनलाईन होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) घेण्याचा निर्णय घेऊ शकते. या बैठकीचा अजेंडामध्ये “महामारीच्या पार्श्वभूमीवर येत्या क्रिकेट हंगामाबाबत चर्चा होईल”.

सौरव गांगुली (Photo Credit: PTI)

BCCI SGM Agenda: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) युएईमध्ये (UAE) निलंबित इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) उर्वरित सामने 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यावर 29 मे रोजी ऑनलाईन होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेत (Special General Meeting) घेण्याचा निर्णय घेऊ शकते. या बैठकीचा अजेंडामध्ये “महामारीच्या पार्श्वभूमीवर येत्या क्रिकेट हंगामाबाबत चर्चा होईल”. याशिवाय, टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आणि रद्द झालेल्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) मागील हंगामासाठी देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी विलंब झालेल्या भरपाई पॅकेजच्या चर्चेबाबतही यात समावेश आहे. बीसीसीआय  यंदाचा टी-20 वर्ल्ड कप भारतात (T20 World Cup in India) आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच 1 जून रोजी आयसीसी (ICC) बोर्डाच्या बैठकी दरम्यान ते या जागतिक मंडळाला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोविड-19 स्थितीचा आढावा घेण्यास सांगतील. (IPL 2021: UAE मध्ये आयपीएल खेळवण्यासाठी BCCI पुढे कठीण आव्हाने, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झाल्यास परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर सस्पेंस)

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) शनिवारी मुंबईच्या बैठकीत उपस्थित राहतील. आयपीएल 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान पुन्हा सुरू होईल आणि 10 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होईल. भारताची कोरोना व्हायरस परिस्थिती पाहता युएई, अबूधाबी, दुबई आणि शारजाह अशा तीन ठिकाणी सामने आयोजित केले जातील. “अर्थात, मुख्य मुद्दा आयपीएल वेळापत्रक असेल. आम्ही फायनलसह चार प्ले-ऑफ गेम्स (2 क्वालिफायर, एक अ‍ॅलिमिनेटर) व्यतिरिक्त 10 डबल-हेडर आणि सात 7 सिंगल सामन्यांची अपेक्षा करत आहोत. पुनरारंभ सामना आणि फायनल शनिवार व रविवार रोजी होईल,” बैठकीच्या आदल्या दिवशी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. शिवाय, परदेशी खेळाडूंची सेवा कशी मिळवावी आणि बबल-टू बबल ट्रान्सफर सह इतर लॉजिस्टिक पैलूंवरही बरेच चर्चा होणार असल्याची अपेक्षा आहे.

ते म्हणाले, “इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट संचालक अ‍ॅशली जाईल्स आधीच म्हणाले आहेत की आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे पालन केले जाणार असल्यामुळे त्याच्या देशातील खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. आशा आहे की, अध्यक्ष आणि सचिव इंग्लिश खेळाडूंची परिस्थिती कशी हाताळली जाईल हे सांगतील,” या घडामोडींचा मागोवा घेणार्‍या एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. जोस बटलर, बेन स्टोक्स (फिट असल्यास), जोफ्रा आर्चर (फिट असल्यास), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, इयन मॉर्गन, मोईन अली हे खेळाडू राष्ट्रीय संघातील अकरा खेळाडू आहेत, त्यामुळे फ्रँचायझींना त्यांचा पर्याय शोधणे सोपे जाणार नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now