TV स्टिंग ऑपरेशननंतर BCCI चे मुख्य निवडकर्ता Chetan Sharma अडचणीत, भारतीय संघाचे अनेक 'गुप्त' आले बाहेर
त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील वादावरही त्यांनी मोठे खुलासे केले आहेत.
Chetan Sharma Controversy: मंगळवारचा दिवस क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक ठरला. बीसीसीआयचे (BCCI) मुख्य निवडक चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्यावर एका वाहिनीने केलेले स्टिंग ऑपरेशन जगभर व्हायरल झाले होते. त्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये चेतन शर्मा स्पष्टपणे संघ निवडीच्या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत होते. त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील वादावरही त्यांनी मोठे खुलासे केले आहेत. चेतन शर्माने मंगळवारी स्टिंग ऑपरेशनमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे ते आता वादात सापडले आहे. बीसीसीआयने अलीकडेच चेतनची दुसऱ्यांदा निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याला वगळण्यात आले होते. पीटीआय भाषेतील एका बातमीनुसार, चेतन शर्माच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंवरही मोठे आरोप केले होते.
80 ते 85 टक्के फिट असूनही खेळाडू संघात राहण्यासाठी इंजेक्शन घेतात, असा आरोप चेतन शर्माने केला आहे. चेतनने असा आरोपही केला होता की सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बुमराहच्या पुनरागमनावरून त्याचा आणि संघ व्यवस्थापनामध्ये वाद झाला होता. त्याने सांगितले की बुमराह ती मालिका खेळण्यासाठी योग्य नाही, परंतु तरीही तो खेळला. (हे देखील वाचा: Shreyas Iyer is Back: मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा दिल्ली कसोटीत सामन्यात सामवेश, 'हा' फलंदांज बाहेर बसण्याची शक्यता)
गांगुली आणि कोहली वादावर चेतन शर्मा काय म्हणाले?
माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही चेतन शर्माने केला आहे. याबाबत पीटीआयने चेतन शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते संभाषणासाठी उपलब्ध नव्हते. बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे कळते. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे कारण निवडकर्ते कराराखाली आहेत आणि त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही.
जय शहा काय घेणार निर्णय?
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “बीसीसीआयचे सचिव जय शाह चेतनच्या भविष्याबद्दल निर्णय घेतील. टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या किंवा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा हे अंतर्गत चर्चा उघड करू शकतात हे जाणून चेतनसोबत निवड बैठकीत बसायचे का, असा प्रश्न उपस्थित होतो.