Bangladesh Squad for T20Is Against India: भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेश संघ जाहीर, तीन युवा खेळाडूंना संधी
स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनला यातून वगळण्यात आले आहे. त्याची निवृत्ती हे त्याचे कारण आहे.
IND vs BAN T20I Series 2024: बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमधील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. यानंतर, दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल, ज्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपला संघ जाहीर केला आहे. नझमुल हुसेन शांतो यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. स्टार अष्टपैलू शाकिब अल हसनला यातून वगळण्यात आले आहे. त्याची निवृत्ती हे त्याचे कारण आहे. बांगलादेशी बोर्डाने भारतीय संघाविरुद्धच्या या टी-20 मालिकेसाठी अशा तीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे, जे गेल्या एक वर्षापासून टी-20 संघाबाहेर होते. मेहदी हसन मिराज, परवेझ हुसैन इमॉन आणि रकीबुल हसन अशी हे तीन खेळाडू आहेत.
टी-20 मालिकेसाठी भारत-बांगलादेश संघ:
बांग्लादेश संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, महमुदुल्ला, लिटन दास, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब आणि तनजीब हसन हसन.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
हे देखील वाचा: Team India Squad For Bangladesh T20 Series: चांगली कामगिरी करुनही BCCI कडून 5 खेळाडू दुर्लक्षित, टीम इंडियात स्थान मिळण्यास होते पात्र
भारत-बांगलादेश टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना - ग्वाल्हेर- 6 ऑक्टोबर
दुसरी टी-20 सामना- दिल्ली- 9 ऑक्टोबर
तिसरी टी-20 सामना- हैदराबाद- 12 ऑक्टोबर
(तीनही टी-20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील)