IPL Auction 2025 Live

बांग्लादेशच्या पाकिस्तान दौर्‍यापूर्वी मुस्तफिजुर रहमान याचे ट्विट व्हायरल, पाकिस्तानच्या सुरक्षिततेशी जोडत Netizens ने उडविली खिल्ली

वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान लाहोरला निघण्याआधी केलेल्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. रहमानने आपल्या सहकाऱ्यांसमवेत ट्विटरवर सेल्फी शेअर करून आपल्या अनुयायांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले.

मुस्तफिजूर त्याच्या साथीदारांसह (Photo Credits: @Mustafiz90/Twitter)

बऱ्याच विचारविनिमयानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) त्याच्या संघाला क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तान पाठविण्यास सहमती दर्शविली. तथापि, त्यांनी पाकिस्तान (Pakistan) मध्ये टी-20 मालिका खेळण्याऐवजी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपली टीम पाठविण्यास नकार दिला. बुधवारी रात्री बांग्लादेश संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानकडे रवाना झाला. मुशफिकुर रहमीनसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव अखेरच्या क्षणी पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशच्या बॅकरूम कर्मचार्‍यांच्या पाच सदस्यांनीही दौऱ्यातून माघार घेतली. मात्र, वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) लाहोरला निघण्याआधी केलेल्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. रहमानने आपल्या सहकाऱ्यांसमवेत ट्विटरवर सेल्फी शेअर करून आपल्या अनुयायांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. (बांग्लादेश संघाचा पाकिस्तान दौरा जाहीर, टीम पाकिस्तानमध्ये टेस्ट मालिका खेळण्यास सज्ज, जाणून घ्या पूर्ण शेड्यूल)

या फोटोमध्ये बांग्लादेशी खेळाडू विमानतळावर हसऱ्या चेहऱ्यासह बसलेले दिसत आहे, परंतु फोटोसह लिहिलेल्या त्याच्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. रहमान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "पाकिस्तानला जात आहो, तुमच्या प्रार्थनांमध्ये आमची आठवण ठेवा." चाहत्यांनी रहमानचे हे कॅप्शन पाकिस्तानमधील सुरक्षिततेशी जोडले आणि त्यांची खिल्ली उडविली. मात्र, रहमान सहसा परदेश दौर्‍यावर जाण्यापूर्वी आपला फोटो पोस्ट करुन असे कॅप्शन वापरतो. पाहा हा फोटो:

पाहा मुस्तफिझूरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आशा आहे की सर्व काही ठीक राहिलं

देव तुम्हाला सुरक्षित ठेवू

विमा पूर्ण झाला आहे

बांग्लादेशच्या पाकिस्तान दौर्‍यानंतर सर्व भारतीय

2008 मध्ये पाकिस्तान दौर्‍यावर आलेल्या श्रीलंकेच्या टीम बसवर लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी श्रीलंका टी-20 आणि टेस्ट मालिकेसाठी पाकिस्तान दौर्‍यावर गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतण्याच्या आशा वाढल्या. तथापि, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बांग्लादेशला दौऱ्यावर आण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीला फक्त टी-20 मालिका खेळण्यास बांग्लादेश संघाने तयारी दर्शवली होती, त्यानंतर काही दिवसांच्या अंतरात वनडे सामना जोडल्यानंतर पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामने खेळण्यास त्यांनी सहमती दर्शविली.