WI vs BAN 3rd ODI Match 2024 Live Streaming: आज बांगलादेश क्लीन स्वीप टाळण्याच्या इराद्याने मैदानात, तर वेस्ट इंडिज मालिका जिंकण्यासाठी सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
या सामन्यात वेस्ट इंडिजचे कर्णधार शाई होप तर बांगलादेशचे कर्णधार मेहदी हसन मिराझ करत आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाने चमकदार कामगिरी केली आणि सहज विजय मिळवला.
West Indies National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team, 3rd ODI Match 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश (WI vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (12 डिसेंबर 2024) म्हणजे आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचे कर्णधार शाई होप तर बांगलादेशचे कर्णधार मेहदी हसन मिराझ करत आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाने चमकदार कामगिरी केली आणि सहज विजय मिळवला. यामध्ये संघाचा स्फोटक फलंदाज शेरफेन रदरफोर्डसह गोलंदाज जेडेन सील्सनेही विशेष योगदान दिले आहे. आता बांगलादेश विजयासह मालिका संपवण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरणार आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 45 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. वेस्ट इंडिजने 23 एकदिवसीय सामने जिंकले असून बांगलादेशने 21 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: West Indies Beat Bangladesh 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी)
किती वाजता सुरु होणार सामना?
वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 12 डिसेंबर रोजी वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
कोणत्याही टीव्ही चॅनेलवर भारतीय दर्शकांसाठी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका प्रसारित करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. क्रिकेटप्रेमींना येथून सामन्याचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ: ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ: झाकेर अली, लिटन दास (विकेटकीपर), तन्झीद हसन, सौम्या सरकार, मेहदी हसन मेराझ (कर्णधार), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, नाहिद राणा.