बांग्लादेश संघाचा पाकिस्तान दौरा जाहीर, टीम पाकिस्तानमध्ये टेस्ट मालिका खेळण्यास सज्ज, जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल दरम्यान बांग्लादेशी संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहे. बांग्लादेश संघाच्या या पाकिस्तान दौऱ्याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती पण बहुतेक बांग्लादेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये जाण्यास टाळाटाळ करीत होते.

बांग्लादेश संघ (Photo Credit: Getty)

अखेर बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट संघाच्या पाकिस्तान (Pakistan) दौर्‍यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल दरम्यान बांग्लादेशी संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहे. बांग्लादेश संघाच्या या पाकिस्तान दौऱ्याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती पण बहुतेक बांग्लादेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये जाण्यास टाळाटाळ करीत होते. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही (Bangladesh Cricket Board) म्हटले होते की ज्या खेळाडूंना जायचे आहे ते जाईल.  मात्र, आता संपूर्ण कार्यक्रम कन्फर्म झाला आहे. आयसीसी (ICC) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात तीन टप्प्यात पूर्ण-लांबीच्या मालिकेसाठी करार केला आहे. करारानुसार बांग्लादेश 24 ते 27 जानेवारी दरम्यान लाहोरमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. नंतर ते 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान रावळपिंडी येथे होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यात खेळण्यासाठी पुन्हा पाकिस्तान दौर्‍यावर येतील.

एप्रिलमध्ये पुन्हा एकदा बांग्लादेशी संघ एकमात्र वनडे आणि त्यानंतर 5 ते 9 एप्रिल दरम्यानचा दुसरा कसोटी सामना पुन्हा पाकिस्तानचा दौरा करतील. पहिल्या टेस्ट सामन्यानंतर 20 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान पाकिस्तान सुपर लीग होणार असल्यानेबांग्लादेशी पाकिस्तान दौऱ्यावरून काही काळ विश्रांती घेतील. यापूर्वी बीसीबी पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थितीचा हवाला देत पाकिस्तानमध्ये कसोटी सामने खेळण्यास संकोच करत होते आणि त्यांना तटस्थ ठिकाणी खेळण्याचा प्रस्तावही पीसीबीने नाकारला होता. पण बांग्लादेश आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सर्व काही स्पष्ट झाले आहे आणि बांग्लादेशने टेस्ट मालिकेसाठी टीम पाकिस्तानला पाठविण्यास मान्य केले आहे.

असा आहे बांग्लादेशच्या पाकिस्तान दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक:

पहिला टी-20 - 24 जानेवारी (लाहोर)

दुसरा टी-20 - 25 जानेवारी (लाहोर)

तिसरा टी-20 - 27 जानेवारी (लाहोर)एकमात्र वनडे - 3 एप्रिल (कराची)

पहिला कसोटी सामना - 7 ते 11 फेब्रुवारी (रावळपिंडी)दुसरा कसोटी सामना - 5 एप्रिल ते 9 एप्रिल (कराची)