
RCB vs PBKS, IPL 2025 Qualifier 1: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा पहिला क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला जात आहे. लीग स्टेज सामन्यांनंतर पंजाब किंग्ज आणि आरसीबी दोघांनीही 19-19 गुणांसह समाप्त केले आहेत, ज्यामध्ये पंजाबचा संघ चांगल्या नेट रन रेटच्या आधारे प्रथम क्रमांकावर राहिला. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्या संघासोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेड टू हेडमध्ये कोण पुढे आहे?
हेड टू हेडमध्ये बंगळुरू आणि पंजाब यांच्यात कठीण स्पर्धा आहे. पंजाब किंग्जने 18 वेळा आरसीबीचा पराभव केला आहे, तर बंगळुरूने 17 वेळा पंजाबचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत, क्वालिफायर-1 मध्येही कठीण स्पर्धा होईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (हे देखील वाचा: PBKS vs RCB, Qualifier 1 Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात पंजाब विरुद्ध बंगळुरूची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी, दोन्ही संघाच्या आकडेवारीवर एक नजर)
'या' खेळाडूंवर असेल सर्वाच्या नजरा
विराट कोहली: आरसीबीचा घातक फलंदाज विराट कोहलीने गेल्या 10 डावात 425 धावा केल्या आहेत. यादरम्यान, विराट कोहलीने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. विराट कोहलीचे उत्तम टायमिंग आणि क्लासिक शॉट्स आरसीबीच्या बाजूने सामना वळवू शकतात.
रजत पाटीदार: आरसीबीचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रजत पाटीदारने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याची घंटा आहे. एकदा रजत पाटीदार लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.
जोश हेझलवूड: आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूडने गेल्या 9 सामन्यात 10 बळी घेतले आहेत. जोश हेझलवूडचा अचूक यॉर्कर आणि स्विंग फलंदाजांना त्रास देऊ शकते.
श्रेयस अय्यर: पंजाब किंग्जचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर या हंगामात संघासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. मधल्या फळीत त्याची फलंदाजी सामन्याला स्थिरता देते आणि जेव्हा जेव्हा संघाला जलद धावांची आवश्यकता असते तेव्हा अय्यर जबाबदारी घेतो. त्याचा अनुभव आणि आक्रमक शैली कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला आव्हान देण्यास सक्षम आहे.
युझवेंद्र चहल: अनुभवी लेग-स्पिनर युझवेंद्र चहल नेहमीच विकेट घेण्याच्या मानसिकतेने गोलंदाजी करतो. कोलकाताच्या मधल्या फळीला तोडण्यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. चहलचा अनुभव आणि विविधता त्याला या सामन्यात पंजाबचा ट्रम्प कार्ड बनवू शकते.
अर्शदीप सिंग: पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग नवीन चेंडूने आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात पारंगत आहे. त्याचे अचूक यॉर्कर आणि स्विंग बॉल विरोधी फलंदाजांना त्रास देऊ शकतात. कोलकाताच्या आक्रमक सलामीवीरांविरुद्ध अर्शदीपची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, युझवेंद्र चहल, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख आणि अर्शदीप सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा, जोश हेजलवुड आणि सुयश शर्मा.