Bahrain vs Italy ICC CWC Challenge League B 2024-26 Live Streaming: आयसीसी क्रिकेट विश्वचषकात बहरीन-इटली यांच्यात आज लढत; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल

आईसीसी सीडब्ल्यूसी चॅलेंज लीग बी 2024-26 चा 8 वा सामना बहरीन संघ विरुद्ध इटली यांच्यात आज म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना कंपाला येथील लुगोगो स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बहरीनने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत.

Bahrain vs Italy ICC CWC Challenge League B 2024-26 Live Streaming: आयसीसी क्रिकेट विश्वचषकात बहरीन-इटली यांच्यात आज लढत; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल
Photo Credit- X

Bahrain National Cricket Team vs Italy National Cricket Team ICC CWC Challenge League B 2024-26 Live Streaming: आईसीसी सीडब्ल्यूसी चॅलेंज लीग बी 2024-26 चा 8 वा सामना आज 12 नोव्हेंबर रोजी बहारीन विरुद्ध इटली संघात (Bahrain vs Italy) होणार आहे. उभय संघांमधील हा सामना कंपाला येथील लुगोगो स्टेडियमवर होणार आहे. बहरीनने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकात विजय मिळवला तर एका पराभवाचा सामोरे जावे लागले आहे. बहारिन संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, इटलीने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. इटलीने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन्ही जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. (हेही वाचा:SYT W vs PRS W 24th Match WBBL 2024 Live Streaming: सिडनी थंडर-पर्थ स्कॉचर्स यांच्यात खेळवला जाणार रोमांचक सामना; लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?)

सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

बहरीन विरुद्ध इटली यांच्या मधील 8 वा सामना आज म्हणजेच मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता कंपालाच्या लुगोगो स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना कुठे पाहायचा?

भारतात बहरीन विरुद्ध इटली यांच्या मधील सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. मात्र, कोणत्याही टीव्ही चॅनलवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही.

दोन्ही संघांचे खेळाडू

बहरीन संघ : उमर तूर, आसिफ अली, सोहेल अहमद, हैदर बट (कर्णधार), सचिन कुमार, अहमर बिन नासेर, शाहबाज बदर (यष्टीरक्षक), इम्रान अन्वर, रिझवान बट, अब्दुल मजीद मलिक, अली दाऊद, इम्रान खान, जुनैद अजीज, मुहम्मद सलमान

इटली संघ: एमिलियो गे, जो बर्न्स, मार्कस कॅम्पोपियानो (कर्णधार), अँथनी मॉस्का, हॅरी मॅनेन्टी, जियान मीड (यष्टीरक्षक), गॅरेथ बर्ग, ग्रँट स्टीवर्ट, जसप्रीत सिंग, दमिथ कोसला, क्रिशन कलुगामागे, वेन मॅडसेन, रकीबुल हसन, जस्टिन मोस्का, स्टेफानो डी बार्टोलोमियो, झेन अली, थॉमस ड्रका

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2024 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).