अजित आगरकर याचा Worst-Ever Tailenders XI मध्ये समावेश केल्याने हर्षा भोगले आणि चाहते संतप्त; कॉमेंटेटरने करून दिली शतक व तुफान अर्धशतकाची आठवण
या संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
विश्वातील सर्वात वाईट टेलरँडर्समध्ये (Worst Tailenders) अजित आगरकर (Ajit Agarkar) याचा समावेश केल्याने हर्षा भोगले (Harsha Bhogle) आणि चाहते संतप्त; कॉमेंटेटरने करून दिली शतक व तुफान अर्धशतकाची आठवण करून दिली. ऑस्ट्रेलियन टीव्ही वाहिनीने जगातील सर्वात वाईट टेलरँडर्सची टीम तयार केली आहे. या संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे फॉक्स क्रिकेटने (Fox Cricket) या इलेव्हनमध्ये ज्या भारतीय अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे त्याने लॉड्समध्ये कसोटी शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा वाहिनी फॉक्स क्रिकेटने गुरुवारी जगातील सर्वात वाईट टेलरँडर्ससह अष्टपैलू इलेव्हनची निवड केली ज्यात त्यांनी अजित आगरकर याचा समावेश केला. आगरकरने इंग्लंडविरुद्ध क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात शतक झळकावले आहे. या यादीत जसप्रीत बुमराह याचाही समावेश आहे. या दोन भारतीय खेळाडूंसह तीन इंग्लिश, दोन ऑस्ट्रेलियन, दोन झिम्बाब्वे, एक कॅरिबियन आणि एक न्यूझीलंड क्रिकेटरचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या लिस्टमध्ये आगरकरच नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Fox Cricket ने ऑस्ट्रेलियाच्या 2023 वर्ल्ड कप संभाव्य प्लेयिंग XI लिस्टमधून आरोन फिंच ला वगळले, डेविड वॉर्नर ने व्यक्त केली निराशा)
प्रसिद्ध क्रिकेट भाष्यकार हर्षा भोगले यांनी आगरकरच्या कसोटी शतकी खेळीची आणि वनडे अर्धशतकाची ट्विटरवरून आठवण करून दिली. हर्षने ट्विटमध्ये लिहिले की, 'आगरकर? त्याच्याकडे कसोटी शतक आहे! 21 चेंडूत वनडे अर्धशतक केले!" आगरकरच्या समर्थनार्थ बऱ्याच लोकांनी ट्वीट केले. त्यांनी आगरकरची फलंदाजीची कामगिरीदेखील ट्विटरवर शेअर केली. दरम्यान, त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऑस्ट्रेलियन मीडिया हाऊसमध्ये मोंटी पनेसार आणि क्रिस मार्टिन सारख्या खेळाडूंचा समावेश होता ज्यांनी बॉलिंगने कमालीचे प्रदर्शन केले, मात्र फलंदाजीने अपयशी ठरले.
फॉक्स क्रिकेटचे सर्वात वाईट टेलरँडर्स
हर्षा भोगले प्रभावित झाले नाहीत!!
तथ्य
चाहते नाखूष!!
अष्टपैलू आगरकर!!
योग्य निवड नाही!!
आगरकरांचे गुणगान
आगरकरांसाठी चुकीचे ठिकाण
आगरकरने भारताकडून 26 कसोटी आणि 191 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी स्ट्रीटमध्ये 16.79 आणि वनडे आंतरराष्ट्रीय मध्ये 14.58 आहे. आगरकरने तीन वनडे अर्धशतक आणि एक टेस्ट शतक झळकावले आहे. त्याने 2007 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि 2013 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.