Australia vs Pakistan T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, पहा दोन्ही संघांची आकडेवारी

ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 11 सामने जिंकले आहेत.

AUS Team (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 3rd T20I Match 2024:   ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series)  दुसरा सामना उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होबार्टमधील (Hobart) बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियमवर  (Bellerive Oval Stadium) खेळवला जाईल. दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने  (Australia) पाकिस्तान (Pakistan) संघाचा 13 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या (Josh Inglis) खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.  (हेही वाचा  - Border Gavaskar Trophy New Milestone: 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, मालिकेत होऊ शकतात हे मोठे विक्रम)

दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.4 षटकांत केवळ 134 धावा करत अपयशी ठरला. पाकिस्तानकडून उस्मान खानने 52 धावांची शानदार खेळी केली.

हेड टू हेड रेकॉर्ड (AUS vs PAK T20I Head To Head)

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. 2022 मध्ये दोन्ही संघ शेवटच्या टी-20 मध्ये भिडले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव केला हेड टू हेड रेकॉर्ड पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवणे पाकिस्तानसाठी तितके सोपे नसेल.