Australia Women Beat Sri Lanka Women, 5th Match Scorecard: ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 6 गडी राखून केला पराभव, बेथ मुनीने 43 धावांची उत्कृष्ट खेळी; येथे पाहा स्कोरकार्ड
ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने विजयासह स्पर्धेची सुरुवात केली आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघासमोर अडचणी वाढत आहेत कारण त्यांचा या स्पर्धेतली सलग दुसरा पराभव आहे.
Australia Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 5th Match Scorecard: आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा पाचवा सामना आज ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने विजयासह स्पर्धेची सुरुवात केली आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघासमोर अडचणी वाढत आहेत कारण त्यांचा या स्पर्धेतली सलग दुसरा पराभव आहे.
Australia begin with a WIN 🏏
🔗 https://t.co/2Aw2GehAU8 | #T20WorldCup pic.twitter.com/Hde9SJXfft
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 5, 2024
त्याआधी, श्रीलंकेचा कर्णधार चमारी अथापथूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो काय योग्य ठरला नाही. श्रीलंकेचा संघ निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 93 धावा करू शकला. श्रीलंकेसाठी नीलाक्षी डी सिल्वाने सर्वाधिक 29 धावांची खेळी खेळली. नीलाक्षी डी सिल्वाशिवाय हर्षिता समरविक्रमाने 23 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुटने सर्वाधिक तीन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास नव्हती आणि अवघ्या 14 धावांवर संघाला दोन मोठे धक्के बसले. यानंतर बेथ मुनी आणि ॲलिस पेरी यांनी मिळून डाव सांभाळला. ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 14.2 षटकांत चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियासाठी बेथ मुनीने 43 नाबाद धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान बेथ मुनीने 38 चेंडूत चार चौकार मारले. बेथ मुनीशिवाय ॲलिस पेरीने 17 धावा केल्या. श्रीलंकेसाठी उदेशिका प्रबोधनी, इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2024 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

