England Beat Australia 4th ODI Match Scorecard: चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव; मालिका 2-2 अशी बरोबरीत; सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team 4th ODI Match Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (England vs Australia )यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळला गेला. हा सामना लंडनमधील लॉर्ड्सवर खेळला गेला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील निर्णायक सामना रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. (हेही वाचा: Sri Lanka vs New Zeland 2nd Test Day 3 Live Streaming: श्रीलंकेची दुसऱ्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड, न्युझीलंड करणार का पुनरागमन? जाणून घ्या कुठे पाहणार लाइव्ह मॅच)
लॉर्ड्सवर खेळल्या जात असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे टॉसला उशीर झाला आणि षटकेही कमी झाली. चौथा एकदिवसीय सामना 39-39 षटकांचा असेल. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी झटपट पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या.
इंग्लंड संघाने 39 षटकांत 5 गडी गमावून 312 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रूकने सर्वाधिक 87 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने 58 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. हॅरी ब्रूकशिवाय बेन डकेटने 63 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने शानदार फलंदाजी केली आणि अवघ्या 27 चेंडूत तीन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 62 धावांची उत्कृष्ट खेळी केली.
ENG विरुद्ध AUS सामन्याचे स्कोअरकार्ड आहे:
सामना जिंकत ऑस्ट्रेलियन संघाला पहिले यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने सर्वाधिक दोन बळी घेतले. ॲडम झाम्पाशिवाय जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 39 षटकात 313 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली आणि मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 68 धावा केल्या. मात्र यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 24.4 षटकात केवळ 126 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. ट्रॅव्हिस हेडशिवाय मिचेल मार्शने 28 धावा केल्या.
चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केला. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मॅथ्यू पॉट्सशिवाय ब्रायडन कारसेने तीन, तर जोफ्रा आर्चरने दोन बळी घेतले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा वनडे सामना रविवार, 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्टल येथील काउंटी ग्राउंड स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल.