Sri Lanka vs New Zeland 2nd Test Day 3 Live Streaming: श्रीलंकेची दुसऱ्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड, न्युझीलंड करणार का पुनरागमन? जाणून घ्या कुठे पाहणार लाइव्ह मॅच
सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंड 580 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 14 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. केन विलियमसन 6 आणि एझाज पटेल 0 वर नाबाद आहेत.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. सकळी 10.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड 580 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 14 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 22 धावा केल्या आहेत. केन विलियमसन 6 आणि एझाज पटेल 0 वर नाबाद आहेत. दरम्यान श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या डावात 600 पार मजल मारली. दरम्यान, या कसोटी मालिकेचे अधिकृत प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Ten 1 SD/HD वर पाहता येईल. याशिवाय FanCode ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. मात्र यासाठी चाहत्यांना वर्गणी घ्यावी लागणार आहे.
Kamindu Mendis piled on runs for fun, rewrote the record books, and once again put Sri Lanka in a position of dominance https://t.co/umqVAU1jvw #SLvNZ pic.twitter.com/vahFe3yLrY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

