AUS A vs IND A 2nd Unofficial Test 2024 Day 1 Stumps: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया अ संघाची धावसंख्या 2 विकेटवर 53 धावा; भारत अ संघापेक्षा 108 धावांनी पिछाडीवर

यजमान संघ भारतापेक्षा 108 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलिया अ संघासाठी सध्या मार्कस हॅरिस 42 चेंडूत 26 धावा आणि सॅम कोन्स्टास 11 चेंडूत 1 धावांवर नाबाद आहे.

IND A vs AUS A (Photo Credit - X)

Australia A National Cricket Team vs India A National Cricket Team 2nd Unofficial Test 2024 Day 1 Stumps: ऑस्ट्रेलिया अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारत अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 07 नोव्हेंबरपासून मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 17.1 षटकात 2 गडी गमावून 53 धावा केल्या आहेत. यजमान संघ भारतापेक्षा 108 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलिया अ संघासाठी सध्या मार्कस हॅरिस 42 चेंडूत 26 धावा आणि सॅम कोन्स्टास 11 चेंडूत 1 धावांवर नाबाद आहे. कर्णधार नॅथन मॅकस्विनी 14 धावा करून बाद झाला तर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट 3 धावा करून बाद झाला. भारत अ संघाकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना मुकेश कुमार आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाची धावसंख्या 57.1 षटकात 161 धावांवर आटोपला. भारत अ संघाकडून ध्रुव जुरेलने अर्धशतक झळकावले. ध्रुव जुरेलने 186 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. ध्रुव जुरेलशिवाय देवदत्त पडिक्कल 26 धावा करून बाद झाला, नितीश रेड्डी 16 धावा करून, कर्णधार ऋतुराज गायकवाड 4 धावा करून आणि केएल राहुल 4 धावा करून बाद झाले. तर अभिमन्यू इसवरन, साई सुदर्शन आणि तनुष कोटियन खाते न उघडताच बाद झाले.

हे देखील वाचा: Border-Gavaskar Trophy 2024-25: पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या जागी केएल राहुल किती आहे फिट? पाहा आकडेवारी

तर ऑस्ट्रेलिया अ संघाकडून मायकेल नेसरने 12.2 षटकात 27 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय स्कॉट बोलंडला एक आणि ब्यू वेबस्टरला 3 बळी मिळाले. सरतेशेवटी कोरी रोचिओली आणि कर्णधार नॅथन मॅकस्वीनी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif