AUS vs PAK 3rd T20I: मिशेल स्टार्क याने गमावली हॅटट्रिकची संधी, शानदार चेंडूवर मोहम्मद रिजवान याला बोल्ड करत सर्वांना केले चकित, पाहा Video

पर्थ येथे सुरु असलेल्या तिसर्‍या आणि अंतिम आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात स्टार्कने बाबरला बाद केल्यावर दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवान यालाही माघारी धाडले. यांच्यानंतर स्टार्सला हॅटट्रिक घेण्याची संधी होती, पण स्टार्कने संधी गमावली. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलेल्या रिझवान स्टार्कचा फुल लेन्थ बॉल खेळू शकला नाही आणि बोल्ड झाला.

Mohammad Rizwan (Photo Credit: Twitter)

पर्थ येथे सुरु असलेल्या तिसर्‍या आणि अंतिम आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अ‍ॅरोन फिंच (Aaron Finch) याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने निर्धारित ओव्हरमध्ये 8 बाद 106 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून पाकिस्तानवर वर्चस्व कायम ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सीन एबॉट आणि मिशेल स्टार्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सध्या दोन्ही संघातील 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. टॉस गमावल्याबर पहिले बॅटिंग करायला आलेल्या पाकिस्तान संघाला सुरुवातीलाच मोठं धक्का बसला. फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझम (Babar Azam) याला केवळ 6 धावांवर मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने सर्वोत्तम स्विंग चेंडू टाकत एलबीडब्ल्यू बाद केले.

एवढेच नव्हे तर स्टार्कने बाबरला बाद केल्यावर दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यालाही माघारी धाडले. यांच्यानंतर स्टार्सला हॅटट्रिक घेण्याची संधी होती, पण स्टार्कने संधी गमावली. रिझवान आऊट झाल्यावर हॅरिस सोहेल फलंदाजीसाठी आला, पण त्याने बचावात्मक शॉट खेळत स्टार्कला हॅटट्रिक पूर्ण करण्यापासून रोखले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलेल्या रिझवान मिळालेल्या संधीचा फायदा करून घेऊ शकला नाही. स्टार्कने फुल लेन्थ बॉल रिझवान खेळू शकला नाही आणि बोल्ड झाला. 27 वर्षीय रिझवान 1 चेंडू खेळून पॅव्हिलिअनमध्ये परतला. पहा व्हिडिओ:

आजच्या या मॅचमध्ये 69 धावांवर पाकिस्तानने 5 गडी गमावले. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पावसाने पाकिस्तानला पराभवापासून वाचविले. पावसामुळे प्रभावित सामन्यात पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने 15 ओव्हरमध्ये पाच बाद 107 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला डकवर्थ-लुईस नियमानुसार 119 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण, पावसाने सर्व सामना धुऊन काढला आणि मॅच ड्रॉ राहिली. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now