Asia Cup 2023 Prize Money: बुधवारपासून सुरू होणार आशिया चषक, विजेत्या आणि उपविजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; वाचा सविस्तर

यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात आयोजित केली जाईल. 21 ऑगस्ट रोजी बीसीसीआयने आशिया कपसाठी संघ जाहीर केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकात श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

Asia Cup 2023

आगामी आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेची तयारी सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतान येथे होणार आहे. यावेळी ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. यावेळी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात आयोजित केली जाईल. 21 ऑगस्ट रोजी बीसीसीआयने आशिया कपसाठी संघ जाहीर केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकात श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यासोबतच श्रीलंकेच्या संघाला भरघोस बक्षीसही मिळाले. आशिया चषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला विजेते म्हणून 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याचवेळी पाकिस्तानला उपविजेते म्हणून 79 लाख रुपये मिळाले. यावेळीही सर्व चाहत्यांच्या नजरा बक्षिसाच्या रकमेकडे लागल्या आहेत.

आशिया चषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा यावेळेस अद्याप झालेली नाही, परंतु 2018 सालानंतर ही स्पर्धा 50 षटकांच्या स्वरूपात खेळवली जात आहे. अशा परिस्थितीत बक्षिसाची रक्कम सुमारे दोन कोटी रुपये असू शकते. आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने 6 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023 Live Streaming: आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून होणार सुरुवात, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार Live)

आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तमाम क्रिकेट चाहते आशिया चषक स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी वनडे फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या या स्पर्धेत हा संघ इंडिया कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आगामी आशिया कपमध्ये टीम इंडिया कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.