ENG vs AUS, Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला शुक्रवारपासुन होणार सुरुवात, जाणून घ्या कोण आहे कोणावर भारी

ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे जी अजूनही खेळली जात आहे. याची सुरुवात 1882-83 मध्ये झाली. 1882 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. या दोघांमधील मालिकेतील पहिला सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

ENG vs AUS (Photo Credit -Twitter)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात 16 जून 2023 पासून ऍशेस मालिका (Ashes Series 2023) सुरु होणार आहे. ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे जी अजूनही खेळली जात आहे. याची सुरुवात 1882-83 मध्ये झाली. 1882 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. या दोघांमधील मालिकेतील पहिला सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. दोघांमधील या ऐतिहासिक मालिकेपूर्वीचे आकडे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (हे देखील वाचा: Indian Test Captain: रोहित शर्माच्या जागी 'हे' अनुभवी खेळाडू आहे कसोटी कर्णधारपदाचे दावेदार, पाहा यादीत कोणाचा आहे समावेश)

कोण आहे कोणावर भारी?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 72 ऍशेस मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 34 वेळा विजय मिळवून आघाडी कायम राखली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने 32 वेळा मालिका जिंकली आहे. याशिवाय 6 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. याआधी 2021-22 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 ने विजय मिळवला होता. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 340 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 140 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 108 सामने जिंकले आहेत.

ऍशेस 2023 साठी दोन्ही संघांचे खेळाडू पहा

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मोईन अली, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टॉंग, ख्रिस वोक्स , मार्क वुड.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement