Ashes 2019: पहिले बाउन्सरने केले जखमी; आता जोफ्रा आर्चर याने स्टीव्ह स्मिथ याच्या फलंदाजीचे अनुसरण करत उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये आर्चर स्मिथप्रमाणे फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो यात तो स्मिथसारखे स्ट्रेट ड्राईव्ह खेळतो.

जोफ्रा आर्चर आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: @cricketcomau/Twitter)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील लीड्स (Leeds) येथे होणाऱ्या अ‍ॅशेस (Ashes) मालिकेच्या तिसर्‍या टेस्टपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ त्याच्या गोलंदाजीचा नाही तर फलंदाजीचा आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील अ‍ॅशेस मालिकेचा थरार आता शिगेला पोहचला आहे. या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात इंग्लंडमध्ये पदार्पण करणा आर्चरने आपल्या धारदार बाऊन्सरने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अस्वस्थ केले. आर्चरमुळे ऑस्ट्रेलियाचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला मानेला चेंडू लागल्याने गंभीर दुखापत झाली आणि यामुळे स्मिथला तिसर्‍या सामन्याला मुकावे लागले आहे. पण, आपल्या फलंदाजीने तो स्मिथची कमतरता भरून काढू शकतो. (Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याच्या 'हेडलेस' GIF वर जोफ्रा आर्चरने दिली खट्याळ प्रतिक्रिया, पहा Tweet)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये आर्चर स्मिथप्रमाणे फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आर्चर स्मिथच्या तंत्रज्ञानासह फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पहिले तो फलंदाज आर्चर आहे असे वाटतच नाही, कारण तो पूर्णपणे स्मिथ सारखी फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो यात तो स्मिथसारखे स्ट्रेट ड्राईव्ह खेळतो. शिवाय, लॉर्ड्स कसोटीत स्मिथने जसा बॉल सोडला तसाच आर्चर देखील करतो. पहा हा व्हिडिओ:

दुसरय्या सामन्यात स्मिथने ज्या पद्धतीने चेंडू सोडला त्याने अनेकांना आश्चर्यचकित केले होते. स्मिथची अशी फलंदाजी करण्याची पद्धत प्रेक्षकांना खूपच मजेशीर वाटत होती. सोशल मीडियावर याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. याच सामन्यात आर्चरचा चेंडू डोक्यावर लागण्याचे स्मिथ जखमी झाला आणि मैदानावरच कोसळला. यामुळे स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी दुसर्‍या डावात खेळू शकला नाही आणि नंतर त्यांने तिसर्‍या कसोटीतूनही माघार घेतली.