Ashes 2019: बॉल टेंपरिंगच्या मालिकेनंतर टीम पेन याच्या Hand Shake परंपरेवर जो रूट आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस निराश

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध बॉल-टेंपरिंग घोटाळ्यानंतर आपली प्रतिमा पुन्हा तयार करण्याच्या हेतून प्रत्येक टेस्ट मालिकेच्या सुरूवातीला प्री-गेम हँडशेकची सुरुवात केली. द गार्डियनच्या वृत्तनुसार रूट आणि बेलिस, दोघेही पेनच्या या परंपरेने निराश झाले आहे.

जो रूट आणि टीम पेन (Photo Credit: ICC/Instagram)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघामधील प्रतिष्ठेची मानली जाणली अ‍ॅशेस (Ashes)  मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस दरम्यान पेन आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) यांच्या हँडशेक ने सर्वात जुनी परंपरा मोडण्यात आली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात बर्मिंघमच्या एजबॅस्टन (Edgbaston) क्रिकेट मैदानावर अ‍ॅशेस मालिकेतील पहिली टेस्ट खेळली जात आहे. गुरुवारी एजबॅस्टन येथे अ‍ॅशेस सुरु होण्याआधी, रूट आणि ट्रेव्हर बेलिस (Trevor Bayliss) यांनी मॅच रेफरी रंजन मदुगले यांना या हँडशेक समारंभाबद्दल कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याचे म्हटले आहे. फूटबॉल प्रमाणे क्रिकेटमध्येही सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू हस्तांदोलन करतात. (Ashes 2019: पहिल्या अ‍ॅशेस टेस्ट मॅचसाठी इंग्लंडचा Playing XI जाहीर; जेसन रॉय याला संधी, जोफ्रा आर्चर याला वगळले)

मार्च 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतलेल्या पेनने केप टाउनमधील दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध बॉल-टेंपरिंग घोटाळ्यानंतर आपली प्रतिमा पुन्हा तयार करण्याच्या हेतून प्रत्येक टेस्ट मालिकेच्या सुरूवातीला प्री-गेम हँडशेकची सुरुवात केली. द गार्डियन (The Guardian) या इंग्लिश वृत्तपत्रानुसार रूट आणि बेलिस, दोघेही पेनच्या या परंपरेने निराश झाले आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका आणि एक टी-20 सामना खेळताना ब्रिटनचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयन मॉर्गन (Eion Morgan) याने पेनच्या या परंपरेचं समर्थन केलं होतं.

कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या तिघांवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी बंदी घालण्यात आली होती. इंग्लंड विरुद्ध पहिल्या अ‍ॅशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया संघात या तिघांचा समावेश केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now