Artistic Swimming Olympics Google Doodle: पाण्यात पोहणारे पक्षी आणि आर्टिस्टिक स्विमिंग ऑलिम्पिक 'गूगल डूडल'

सर्ज इंजिनच्या मुखपृष्टाला भेट देताच आर्टिस्टिक स्विमिंग ऑलिम्पिक 'गूगल डूडल' (Artistic Swimming Olympics Google Doodle Today) आपले पाण्यात पोहणाऱ्या पक्षांद्वारे स्वागत करते. काय आहे आजच्या डूडलमध्ये खास? घ्या जाणून.

Artistic Swimming Olympics Google Doodle | (Photo Credits: X)

पॅरिस ऑलिंपिक 2024 स्पर्धा (Paris Olympics 2024) ऐन भरात आली आहे. जगभरातील क्रीडाप्रेमी या स्पर्धेकडे उत्सुकतेने पाहात आहेत. स्पर्धेचा आनंद घेत आहे. दररोज पदकांची लयलूट होत आहे. सोबतच सहभागी खेळाडूंच्या कौशल्याचाही कस लागत आहे. अशा वेळी जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल हेसुद्धा या आनंदात सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे हा आनंद साजरा करताना गूगलने त्याला ॲनिमेटेड तंत्रज्ञानाची जोड देऊन खास डूडल (Google Doodle) तयार केले आहे. सर्ज इंजिनच्या मुखपृष्टाला भेट देताच आर्टिस्टिक स्विमिंग ऑलिम्पिक 'गूगल डूडल' (Artistic Swimming Olympics Google Doodle Today) आपले पाण्यात पोहणाऱ्या पक्षांद्वारे स्वागत करते. काय आहे आजच्या डूडलमध्ये खास? घ्या जाणून.

काय आहे आजचे डूडल?

आजचे गूगल डूडल पॅरीसमध्ये रंगलेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेतील कलात्मक पोहण्याचा दुसरा दिवस दर्शवते. ज्यामध्ये पाण्यात पोहणारे तीन पक्षी आपले स्वागत करतात. या तीन पक्षांच्या आजूबाजूला असलेले इतर पक्षी त्यांच्याकडे कुतुहलाने पाहत आहेत. तर हे तिघे कारंजांमध्ये उसळणाऱ्या पाण्यांमध्ये डुंबत आपला आनंद साजरा करत आहेत. डूडलमधील पक्षी ऑलिम्पिकमधील जलतरणपटूंच्या मनातील भावनाच दर्शवतात जणू. प्रामुख्याने “कलात्मक जलतरण स्पर्धकांच्या मनात दोन गोष्टी असतात: उपस्थित सामायिकता आणि पोहणे!” (हेही वाचा, Gymnastics Rings Google Doodle: रिंग जिम्नास्टिकसाठी गुगलकडून खास डूडल)

भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला 10 दिवस झाले. या 10 दिवसांमध्ये भारताने 3 कांस्य पदके मिळवली आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील भारताचा 10 वा दिवस भारतासाठी चढ-उतारांनी भरलेला होता, जिथे खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या संधींना पदकांमध्ये रूपांतरित करण्यात अयशस्वी ठरले. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पुरुष एकेरीचे बॅडमिंटन पदक जिंकण्याच्या अगदी जवळ असलेल्या लक्ष्य सेनवर याच्यावर कांस्यपदकासाठी देशाच्या नजरा खिळल्या होत्या. परंतू,पहिली फेरी जिंकूनही, तो मलेशियाच्या ली झी जियाविरुद्धच्या कांस्यपदकाच्या सामन्यात हरला. नेमबाज महेश्वरी चौहान आणि आनंद जीतसिंग नारुका हे स्कीट मिश्रित सांघिक एकोपा बनवण्यात कमी पडले. त्यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना विरुद्ध कांस्यपदकाची स्पर्धा एका गुणाने गमावली. (हेही वाचा, Video: असे दृश्य कधीच पाहिले नसेल! चीनच्या महिला डायव्हर्सनी ऑलिम्पिकमध्ये केली कमाल, व्हिडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क)

अनेक खेळांकडून निराशा

अविनाश साबळे आपल्या कामगिरीने चर्चेत आला. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत, आशियाई क्रीडा स्पर्धेतील विद्यमान विजेत्याने हीट 2 मध्ये पाचवे स्थान मिळवले आणि त्याच्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला. मनिका बत्राच्या रोमानियाविरुद्धच्या विजयामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळू शकला. भारतीय खलाशी विष्णू सरवणन आणि नेत्राही कुमनन, म्हैस , आपापल्या इव्हेंटमध्ये पदकांची शर्यत करू शकले नाहीत.

अविनाश साबळे आपल्या कामगिरीने चर्चेत आले. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत, आशियाई क्रीडा स्पर्धेतील विद्यमान विजेत्याने हीट 2 मध्ये पाचवे स्थान मिळवले आणि त्याच्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला. मनिका बत्राच्या रोमानियाविरुद्धच्या विजयामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळू शकला. भारतीय खलाशी विष्णू सरवणन आणि नेत्राही कुमनन आपापल्या इव्हेंटमध्ये पदकांची शर्यत पार करू शकले नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif