Arjuna Award विजेत्या Sheetal Devi यांनी घेतली महिंद्रा स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी, Anand Mahindra कडून खास पोस्टद्वारे कौतूक

भारतीय पॅरालिंपिक तिरंदाज शीतल देवी ने महिंद्रा स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी घेतली आहे. शीतल देवी ने डिलिव्हरी घेतल्यानंतर, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रीया दिली, 'तिला स्कॉर्पिओमध्ये पाहून मला अभिमान वाटतो.' असे ते म्हणाले.

Photo Credit- X

 Sheetal Devi: भारतीय पॅरालिंपिक तिरंदाज शीतल देवी हिने महिंद्रा स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी घेतली आहे. शीतल देवी (Sheetal Devi) यांनी डिलिव्हरी घेतल्यानंतर, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी प्रतिक्रीया दिला, 'तिला स्कॉर्पिओमध्ये पाहून मला अभिमान वाटतो.' असे ते म्हणाले. एक्सवरील एका पोस्टमध्ये, आनंद महिंद्रा यांनी शीतल देवीचे तिच्या नवीन महिंद्रा कारसोबतचे फोटो शेअर केले आणि म्हटले की, "शीतल आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे आणि मला तिला स्कॉर्पिओ एनमध्ये पाहून अभिमान वाटतो,

ते पुढे म्हणाला, "मी शीतल देवीचे खूप पूर्वीपासून कौतुक करत आलो आहे. तिला प्रत्यक्ष भेटल्यावर, तिचा उल्लेखनीय दृढनिश्चय, चिकाटी आणि एकाग्रता पाहून मी प्रभावित झालो. तिची आई आणि बहिणीसोबत संवाद साधल्यावर स्पष्ट झाले की हे कौशल्य त्यांच्या कुटुंबातच आहे. "

आनंद महिंद्रा यांनी असेही सांगितले की शीतल देवी यांनी त्यांना एक बाण भेट दिला आणि त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. "त्याने मला एक बाण भेट दिला, जो धनुर्धर म्हणून तिची ओळख दर्शवतो. खरोखरच अमूल्य आहे," असे ते म्हणाले.

भारताची सर्वात तरुण पॅरालिंपिक पदक विजेती

शीतल देवी ही एक भारतीय पॅरा-तिरंदाज आहे. जिने फोकोमेलियामुळे हातांशिवाय जन्माला येऊनही उल्लेखनीय यश मिळवले आहे. अवघ्या 17 व्या वर्षी, 2024 पॅरिस पॅरालिंपिकमध्ये मिश्र संघ कंपाऊंड स्पर्धेत कांस्यपदक जिंकून ती भारताची सर्वात तरुण पॅरालिंपिक पदक विजेती ठरली. तिच्या या कामगिरीमध्ये 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समधील दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक समाविष्ट आहे. यामध्ये जागतिक पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्य आणि आशियाई पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक समाविष्ट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement