अनुष्का शर्मा स्वत:ला म्हणाली 'बेवकूफ लडकी', इंस्टाग्राम गेममध्ये फेल झाल्यावर विराट कोहली ने अशाप्रकारे केली मदत (VIDEO)
अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर अंदाज बांधणारा खेळही खेळण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने तिला फारशी साथ दिली नाही. त्यानंतर अनुष्काने स्वत: ला "मूर्ख मुलगी" म्हटले. या बॉलीवूड अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
भारतात 3 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्व जण अजून काही दिवसांपर्यंत घरात कैद झाले आहे. क्रिकेटपटू, अभिनेते कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. दोघे या लॉकडाउनमध्ये कुटुंब सोबत व्यतीत केलेल्या क्षणांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत आहे. अनेक अभिनेते, क्रिकेटपटू सध्या इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय झाले आहेत. अनुष्काचाही यात समावेश आहे. नुकतंच या बॉलीवूड अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर अंदाज बांधणारा खेळही खेळण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाने तिला फारशी साथ दिली नाही. अभिनेत्रीने स्वत: फिल्टरवर संघर्ष करत असल्याचा एक आनंददायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (विराट कोहली ने सुनावली संघर्षाची कहाणी; स्टेट टीममध्ये न निवडल्याने रात्रभर रडलो, 'माझी निवड का होत नाही' असंही कोचला विचारले)
तिला एक क्लू मिळाला, 'स्टींग रेंज अर्थ इंक' आणि ती बऱ्याचद हे जोरात बोलण्याचा प्रयत्न करते, जे कधीही बरोबर होत नाही. अखेरीस ती म्हणते 'स्ट्रेंज थिंग्ज', पण तिचा क्रिकेटर नवरा विराट कोहली तिच्या मदतीला येतो आणि तिला 'स्ट्रेंजर थिंग्ज' असे योग्य उत्तर सांगतो. विराट या व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण मागून त्याचा आवाज ऐकायला येतो. त्यानंतर अनुष्काने स्वत: ला "मूर्ख मुलगी" म्हटले. तुम्हीही पाहा हा मजेदार व्हिडिओ:
अनुष्का आणि विराट या लॉकडाउनमध्ये स्वतःला बोर होण्यापासून वाचवण्यासाठी वेगळे मार्ग शोधत आहे. यापूर्वी त्यांनी घरात 'मोनोपोली', 'लुडो'चा खेळ खेळला. शिवाय, दोघे वेगवेगळ्या पदार्थांचाही आस्वाद घेत आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर तिच्या आईने बनवलेल्या बेसन बर्फी आणि पाणीपुरीचा फोटोही शेअर केला होता. शिवाय दोघे चाहत्यांना या कठीण काळात सावध राहून स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेण्याचाही संदेश देत आहे. लवकरच अनुष्का आपल्या प्रोडक्शन हाऊसची वेब सीरिज निर्माता म्हणून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर करणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2020 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

