IPL 2021: हैदराबादविरुद्ध Anrich Nortje भेदक गोलंदाजी, टाकला हंगामातील सर्वात वेगवान आणि खतरनाक चेंडू; पाहा आयपीएल इतिहासातील टॉप-5 वेगवान गोलंदाज
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या लेगमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एनरिच नॉर्टजेने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नॉर्कियाने पुढच्याच षटकात स्वतःचा विक्रम मोडला. नॉर्टजेने तब्बल 151.7 इतक्या वेगाचा चेंडू टाकत फलंदाजालाही हैराण करुन टाकलं.
आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या लेगमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एका गोलंदाजाने मोठा कारनामा केला आहे. अशी कामगिरी पाहून फलंदाज थरथरणारच. हा गोलंदाज म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचे एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) आहेत. या उजव्या हाताच्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नॉर्कियाने पुढच्याच षटकात स्वतःचा विक्रम मोडला आणि नंतर दुसरा चेंडू टाकला जो या इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ठरला. नॉर्टजेने तब्बल 151.7 इतक्या वेगाचा चेंडू टाकत फलंदाजालाही हैराण करुन टाकलं. नॉर्टजेने या हंगामात पहिले आठ सर्वात वेगवान चेंडू टाकले, त्यापैकी तीन चेंडूंच्या वेगाने 150 किमी प्रतितास पार केला. नॉर्टजेने 151.71kmph, 151.37kmph, 150.21kmph, 149.97kmph, 149.29kmph, 149.15kmph आणि 148.76kmph अशा वेगाने हैदराबाद विरोधात सामन्यात गोलंदाजी केली. (IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा दिमाखदार विजय, SRH ला 8 विकेटने धूळ चारून प्लेऑफच्या दिशेने उचलले आणखी एक पाऊल)
27 वर्षीय दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाने हैदराबादविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 3.00 आणि 14 डॉट बॉलच्या इकॉनॉमी रेटने 12 धावा देत 2 बाद अशी उत्कृष्ट आकडेवारीची देखील नोंद केली. दरम्यान, नॉर्टजेने पहिल्याच षटकात सनरायझर्सला धक्का दिला. त्याने पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सनरायझर्सचा सलामीवीर डेविड वॉर्नरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नॉर्टजेने वॉर्नरला बॅक ऑफ लेंथ बॉल टाकला जो लेग स्टंपच्या दिशेने जात होता. वॉर्नरने लेग स्क्वेअरवर खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू किंचित बाहेर होता ज्यामुळे बॉल त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागला आणि अक्षर पटेलने त्याचा सहज झेल पकडला. इथेही वॉर्नर नॉर्टजेच्या वेगात जाळ्यात सापडला. दुसरीकडे, यापूर्वी त्याने आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रमही आपल्या नावावर आहे. दरम्यान, गेल्या वर्षी आयपीएलच्या 2020 च्या मोसमात 156.22 इतक्या वेगाने चेंडू टाकत नॉर्टजेने विक्रम केला होता. त्यानंतर आता यंदाच्या चालू हंगामातही वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम त्यानेच केला आहे.
त्याने गेल्या हंगामात 156.22 च्या वेगाने चेंडू टाकला. याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरही त्याचेच नाव आहे. त्याने अनुक्रमे 155.21 आणि 154.74 वेगाने गोलंदाजी केली. नॉर्टजेनंतर त्याच्या दक्षिण आफ्रिकी सहकारी डेल स्टेनचे नाव आहे. डेक्कन चार्जेसकडून खेळत स्टेनने 154.40 च्या वेगाने गोलंदाजी केली. त्याचा हा चेंडू यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रबाडा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 154.23 च्या वेगाने चेंडू टाकला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)