Most Educated Wives of Indian Cricketers: कोणी पदवीधर तर कोणी डॉक्टर, या 5 स्टार टीम इंडिया क्रिकेटपटूंच्या पत्नींची मार्कशीट त्यांच्यापेक्षाही सरस!

भारतातीय या दिग्गज क्रिकेटपटूंच्या पत्नी किती शिकलेल्या आहे हे फार कमी जणांनाच माहिती असेल. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की या खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने शिक्षित आहे.

अनुष्का शर्मा आणि आयशा धवन (Photo Credit: Instagram)

Most Educated Wives of Indian Cricketers: भारत क्रिकेटचे एखाद्या धर्मासारखे अनुसरण केले जाते. खेळाच्या प्रत्येक चाहत्याला राष्ट्रीय संघाकडून खेळणार्‍या खेळाडूंची प्रत्येक माहिती माहित असते. त्यांच्या पार्श्वभूमीपासून ते त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनापर्यंत जवळपास सर्वकाही माहित असते. सचिन तेंडुलकर पासून विराट कोहलीपर्यंत चाहत्यांना मैदानावरील क्रिकेटपटूंच्या विक्रमांविषयी ते त्यांच्या आवडी-निवडीबद्दल अधिक माहिती असते. मॉडेन डे क्रिकेटचे चाहते केवळ खेळाचे अनुयायी नसून मैदानाबाहेर क्रिकेटपटूंच्या संपर्कात राहायला त्यांना आवडते आणि हे करत असताना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूने मान्य केलेल्या ब्रँडची उत्पादने देखील खरेदी करण्याची ते खात्री करतात. दरम्यान, भारतातीय या दिग्गज क्रिकेटपटूंच्या पत्नी किती शिकलेल्या आहे हे फार कमी जणांनाच माहिती असेल. अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की या खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने शिक्षित आहे. (टीम इंडियातील ‘हे’ 5 स्टार क्रिकेटपटू आहेत ‘या’ पाच श्रीमंत कुटुंबांचे जावई)

सचिन- अंजली तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर सर्वांनाच परिचयाची आहे. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून प्रसिद्ध सचिनने वांद्रे (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले तर त्याची पत्नी अंजलीकडे वैद्यकीय पदवी असून ती डॉक्टर आहे.

विराट कोहली-अनुष्का शर्मा

विराट कोहली केवळ 12 वी पर्यंत विशाल भारती पब्लिक स्कूल, नवी दिल्ली येथे शिकू शकला. त्याचा दिल्ली आणि भारत अंडर-19 संघासोबतचा क्रिकेट प्रवास जगभरात ज्ञात आहे. पण शिक्षणाच्या बाबती विराटची पत्नी अनुष्का पुढे निघाली. अनुष्काचे शिक्षण आर्मी स्कूलमध्ये झाले आणि तिने माउंट कार्मेल कॉलेजमधून आर्ट्स पदवी घेतली.

शिखर धवन-आयशा मुखर्जी

‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने क्रिकेटला आपल्या कारकिर्दीच्या पुढे ठेवले आणि 12वी नंतर पुढे शिक्षक पूर्ण करू शकला नाही. त्याने दिल्लीतील पस्चिम विहार येथील सेंट मार्क्स सीनियर सेकंडरी स्कूलमधून आपले शालेय शिक्षण घेतले. धवनची पत्नी आयशा व्यावसायिक बॉक्सर असून तिने ऑस्ट्रेलिया येथे आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

रोहित शर्मा-रितिका सजदेह

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी निवड झाल्यामुळे ‘हिटमॅन’ रोहितने फक्त बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण अवर लेडी ऑफ वैलांकणी हायस्कूलमध्ये केले आणि मुंबईतील रिझवी महाविद्यालयातही शिक्षण घेतले. रोहितच्या उलट त्याची पत्नी रितिका स्पोर्ट्स मॅनेजर आहे पण लग्नानंतर ती रोहित शर्माचे मॅनेजर म्हणून काम पाहते.

एमएस धोनी-साक्षी धोनी

एमएस धोनीने प्रथम डीएव्ही जवाहर विद्या मंदिरात शिक्षण घेतले जेथे त्याने फुटबॉल आणि बॅडमिंटनमध्ये प्रगती केली. त्यानंतर तो रांचीच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये गेला परंतु क्रिकेटकडे आकर्षणामुळे तो बाहेर पडला आणि इथून त्याने स्वत:चे नाव कमवायला सुरुवात केली. दुसरीकडे, धोनीची पत्नी साक्षी याबाबतीत मात्र सरस निघाली. साक्षी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर आहे.