IPL Auction 2025 Live

पत्नी Dhanashree Verma सोबत घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, Yuzvendra Chahal ची अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती

त्यानंतर त्याच वर्षी 22 डिसेंबरला लग्न झाले. एंगेजमेंट आणि लग्नाची बातमी दोघांनी सोशल मीडियावरून दिली होती.

Dhanashree Verma and Yuzvendra Chahal (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. चहल सध्या आशिया कपसाठी तयारी करत आहे. दरम्यान, एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी चहल त्याच्या खेळामुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) त्याचे संबंध बिघडले असून, दोघे घटस्फोट घेणार आहेत. सोशल मिडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन चहलने इंस्टाग्रामद्वारे केले आहे.

काही काळापूर्वी धनश्री वर्माने ‘चहल’ हे आडनाव आपल्या इंस्टाग्राम युजरनेममधून काढून टाकले होते. दुसरीकडे चहलने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो अपलोड केला होता, ज्याच्या मजकुराचा आशय, ‘एका नवीन जीवनाची सुरुवात’, असा होता. तेव्हापासून या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नाही, अशा चर्चा रंगू लागल्या. सोशल मीडियावरील दोघांच्याही अशा वागण्यामुळे दोघांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, धनश्रीने याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

युझवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी टाकली आहे, ज्यात त्याने अफवांवर विश्वास ठेऊ नये अशी विनंती केली आहे. तो म्हणतो, ‘तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आमच्या विभक्त होण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया याला पूर्णविराम द्या. सर्वांना प्रेम आणि शुभेच्छा.’ (हेही वाचा: माजी स्टार क्रिकेटर Vinod Kambli वर कोसळले आर्थिक संकट; BCCI च्या पेन्शनवर होत आहे कुटुंबाचे पालन पोषण, नोकरीच्या शोधात)

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात 8 ऑगस्ट 2020 रोजी धनश्री आणि चहलची एंगेजमेंट झाली. त्यानंतर त्याच वर्षी 22 डिसेंबरला लग्न झाले. एंगेजमेंट आणि लग्नाची बातमी दोघांनी सोशल मीडियावरून दिली होती. धनश्री आणि चहल अनेकदा इन्स्टाग्राम रीलवर डान्स करताना दिसतात. आयपीएल तसेच टीम इंडियाच्या सामन्यांदरम्यान धनश्री स्टेडियममध्ये दिसत असते.