IPL Auction 2025 Live

Ambati Rayudu To Join Politics: अंबाती रायुडू करणार नवी इनिंगला सुरुवात, लोकसभा निवडणूक लढवण्याचा करत आहे विचार

अंबाती रायडू मूळचा गुंटूरचा असून त्यांनी गेल्या आठवड्यात दोनदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती.

Ambati Rayudu To Join Politics (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू (Amabti Rayudu) आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कृष्णा किंवा गुंटूर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक (Loksabha Election)  लढवण्याचा विचार करत आहे. राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा आपला इरादा स्पष्ट करणारा रायुडू वायएसआरसीपीमध्ये (YSRCP) सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. अंबाती रायडू मूळचा गुंटूरचा असून त्यांनी गेल्या आठवड्यात दोनदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती. जगन पुढील निवडणुकीत रायुडूला उभे करण्यास उत्सुक असले तरी, त्यांना विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत उभे करायचे की नाही हे त्यांनी अद्याप ठरवलेले नाही.

जगन यांच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले, “मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे राजकारणात प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते सर्व क्षेत्रांत विकासाचे नेतृत्व करत आहेत. (हे देखील वाचा: Andy Roberts on Team India: 'भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढलाय'; वेस्ट इंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूने भारतीय संघावर केली टीका)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी रायडूला विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास पोन्नूर किंवा गुंटूर पश्चिम क्षेत्रांपैकी एक निवडा, असे सुचवले आहे. त्यांना वाटते की मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघ हा त्यांचा सर्वोत्तम पर्याय आहे.

अंबाती रायडूनेही यावर्षी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात, गुजरात टायटन्स विरुद्ध, अंबाती रायडूने 8 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 18 धावांची शानदार खेळी करत चेन्नईला पाचव्यांदा चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली.