IND vs PAK Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदांज करु शकतात कहर, 'या' दिग्गज खेळाडूंवर असतील सर्वाच्या नजरा
दोन्ही संघांमधील हा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
IND vs PAK: आशिया चषकाची पहिली सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला. यावेळी आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी (IND vs NEP) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. टीम इंडियाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. शेवटच्या वेळी टीम इंडियाने 2018 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते आणि त्यावेळी देखील ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तर पाकिस्तान संघ 11 वर्षांपासून विजयाची वाट पाहत आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK: आशिया चषकात पाकिस्तानशी होणाऱ्या लढतीपूर्वी टीम इंडियाने लुटला सुट्टीचा आनंद, शमीने फोटो केला शेअर)
सर्वांच्या नजरा असतील या दिग्गज फलंदाजांवर
शुभमन गिल : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलच्या बॅटला यंदा आग लागली आहे. 2023 मध्ये शुभमन गिलने 12 सामन्यात 68.18 च्या सरासरीने 750 धावा केल्या आहेत. या काळात शुभमन गिलने 3 शतकी खेळीही खेळली आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलची आशिया चषकातील कामगिरी संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
विराट कोहली : आशिया कपमध्ये विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिली आहे. विराट कोहली मोठ्या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रोहित शर्मा : 2018 साली टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली शेवटच्या वेळी आशिया कपवर कब्जा केला. यावेळीही रोहित शर्माच्या नजरा बॅटने आणखी चांगली कामगिरी करून असेच काही करण्यावर असतील. रोहित शर्मा हा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.