IND vs WI T20 Series 2023: मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचे पहिले काम म्हणजे टी-20 संघ निवडणे, जाणून घ्या कसा असु शकतो संघ
सध्या टी-20 संघाच्या अनुपस्थितीचे एक कारण म्हणजे बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाची रिक्त जागा
भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे (India tour of West Indies 2023), जिथे 12 जुलैपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. वनडे आणि कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे, तर टी-20 (IND vs WI T20 Squad 2023) साठी संघ अजून यायचा आहे. सध्या टी-20 संघाच्या अनुपस्थितीचे एक कारण म्हणजे बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाची रिक्त जागा. मात्र मंगळवारी बीसीसीआयने नवा मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. विंडीज दौऱ्यासाठी टी-20 संघ निवडणे हे आगरकरचे पहिले काम असेल.
आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्या खेळाडूंचा होवू शकतो समावेश
वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका खूप महत्त्वाची आहे, ती पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणूनही पाहिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्या खेळाडूंचा या मालिकेत समावेश करावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. (हे देखील वाचा: IND vs WI Test Series 2023: एवढ्याच धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास, सेहवाग आणि शास्त्रीला टाकणार मागे)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मिळू शकते विश्रांती
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात येणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-20 मधून विश्रांती दिली जाऊ शकते. मोहम्मद शमीला टी-20 साठी बोलावले जाऊ शकते, कारण शमीचा कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांचाही टी-20 संघात समावेश होऊ शकतो. आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडणाऱ्या ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा, रिंकू सिंग यांचा संघात समावेश करण्याबाबत विचार केला जात आहे.