Euro T10 लीगमध्ये तुफान आलया, अहमद नबी याने अवघ्या 28 चेंडूत शतक ठोकत रचला विश्वविक्रम
युरोपीय क्रिकेट लीगमध्ये नबीने 28 चेंडूंत 14 षटकारांच्या आतषबाजीने शतकी खेळी केली.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) याच्या नावावर आहे. 2013 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Royal Challengers Bengaluru) प्रतिनिधित्व करताना पुणे वॉरियर्सविरुद्ध गेलने 30 चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर क्लब क्रिकेटमध्ये भारताच्या वृद्धीमान सहाने 20 चेंडूत शतक केले आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत अहमद नबी (Ahmad Nabi) याने युरोपियन टी-10 क्रिकेट लीगमध्ये अवघ्या 28 चेंडूत शतक ठोकून नव्या क्रिकेट विश्वविक्रमाची नोंद केली आहे. युरोपीय क्रिकेट लीग (European Cricket League) क्रिकेट चाहत्यांमध्ये इतके प्रसिद्ध नाही आहे. पण या लीगमध्ये अनेकांना थक्क करून टाकणारी खेळी फलंदाजांनी केली आहे.
ड्रॅक्स क्रिकेट क्लबच्या नबीने 28 चेंडूंत 14 षटकारांच्या आतषबाजीने शतकी खेळी केली. नबीच्या तुफानी खेळीच्या जोरावर ड्रॅक्स संघाने 10 ओव्हरमध्ये 6 बाद 164 धावा केल्या. त्याने नाबाद 105 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्लज क्रिकेट क्लबला 10 ओव्हरमध्ये 5 बाद 69 धावाच करता आल्या. महत्वाचे म्हणजे, आयसीसी कडून टी-10 लीगला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
आजकाल क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक विक्रमांची नोंद केली जाते जयच्यावर चाहत्यांचा अजिबात विश्वास बसत नाही. याच कारणामुळे संपूर्ण विश्वात क्रिकेटची प्रसिद्धी चौपट वेगात वाढत आहे. आणि यांच्यामुळे युरोपमध्ये प्रथमच क्रिकेट व्यावसायिकपणे खेळला जात आहे.