IND vs SA 1st T20I: पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर कर्णधार रोहित 'या' खेळाडूंच्या कामगिरीने झाला थक्क, कौतुकात म्हणाला...

सामन्यानंतर कर्णधार म्हणाला, ‘धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 8 गडी राखून पराभव केला. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर, भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले, ज्याला प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 8 विकेट गमावत 106 धावा करू शकला. भारताने ही धावसंख्या 16.4 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. केएल राहुलने नाबाद 51 आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावा केल्या. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संपूर्ण संघाचे कौतुक केले आहे.

धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते

रोहितने सामन्यानंतर सांगितले की, सामना सोपा नव्हता, पण ज्या संघाने चांगला खेळ केला त्याला विजय मिळाला. सामन्यानंतर कर्णधार म्हणाला, ‘धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते. जेव्हा तुम्ही असा सामना खेळता तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. आम्हाला माहित होते की या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत होईल पण संपूर्ण 20 षटकांसाठी ते उपयुक्त ठरेल हे आम्हाला माहीत नव्हते. खेळपट्टी ओलसर होती. चांगला खेळ करणाऱ्या संघाला विजय मिळाला.

सूर्या आणि राहुलची भागीदारी अप्रतिम

रोहित म्हणाला, “आम्ही सुरुवातीच्या षटकांमध्ये पाच-सहा विकेट घेतल्या. परिस्थिती कशीही असो, तुम्हाला तुमच्या योजनेचे पालन करावे लागेल. आमच्या गोलंदाजांनी तेच केले. आम्हाला माहित आहे की 107 हे सोपे लक्ष्य असणार नाही आणि काहीवेळा तुम्हाला परिस्थिती समजून घेऊन तुमचा शॉट निवडावा लागेल. दोन गडी गमावल्यानंतर सूर्या आणि राहुलची भागीदारी अप्रतिम होती. एक टोक धरून दुसऱ्या टोकाकडून धावा काढणे महत्त्वाचे आहे. (हे देखील वाचा: Suresh Raina Catch Video: 35 वर्षीय सुरेश रैनाने हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल (Watch Video)

अर्शदीप आणि चहर चमकले

अर्शदीप सिंहच्या तीन विकेट्स आणि दीपक चहरच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका पत्त्याच्या गठ्ठाप्रमाणे कोसळली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने 4 षटकात 32 धावा देत तीन बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 41 धावा केल्या.