योगराज सिंह यांचा एमएस धोनीवर 'यू टर्न', आता या गोष्टीसाठी करताहेत 'कॅप्टन कूल'चे कौतुक, पहा (Video)

शिवाय धोनी एक 'महान खेळाडू' आहे म्हणून त्याला संबोधित केले.

योगराज सिंघ आणि एम एस धोनी (Photo Credit: Getty Images)

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग युवराज सिंह (Yuvraj Singh) याचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) आणि महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांचा इतिहास सांगणे काही गरजेचे नाही. योगराज यांनी अनेकदा धोनी अनेक कारणांनी आरोप केले आहे. आपला मुलगा युवराजचे करिअर संपवण्यापासून यंदाच्या क्रिकेट विश्वचषक सेमीफायनलमध्ये मुद्दाम खराब खेळी करण्यासारखे गंभीर आरोप योगराज यांनी याआधी केले आहेत. पण योगराज यांनी आता संवेदनाशून्यपणे यू-टर्न घेत म्हटले आहे की नुकत्याच झालेल्या विश्वचषकमध्ये टीम इंडियाच्या पराभवासाठी त्यांनी धोनीला कधीच दोष दिला नाही. माजी क्रिकेटपटू पुढे धोनीला एक 'महान खेळाडू' म्हणून संबोधित करत म्हणाले की ते धोनीचे फॅन आहे. (बेंगळुरूमध्ये MS Dhoni याची पॅराशूट रेजिमेंटसोबत ट्रेनिंगला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर)

टीम इंडियाच्या (Indian Team) वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर न जाता धोनीने निवड समितीकडे दोन महिन्यांची विश्रांतीसाठी विनंती केली होती. आता हे दोन महिना धोनी भारतीय सैन्याच्या पॅराशुट रेजिमेंटसोबत सराव करणार आहे. याबद्दल जेव्हा योगराज यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्याचे याबाबत कौतुक देखील केले. त्यांना वाटते की एखाद्याने देशासाठी खूप काळ काम केले पाहिजे. शिवाय जेव्हा तो भारतीय संघासाठी खेळात होता तेव्हा त्याने काही चांगले निर्णय घेण्यासाठी धोनीची प्रशंसा केली. "यात काही शंका नाही की तो बराच वेळापासून देशाची सेवा करत आहे. तो एक महान खेळाडू आहे. खरं तर मी धोनीचा फॅन आहे. ज्याप्रकारे तो क्रिकेट खेळाला, ज्या प्रकारे नेतृत्व केले, त्याने घेतलेले निर्णय, खूप चांगले आहे."

योगराज सिंह यांनी धोनीला टार्गेट केलं आहे. याआधीही त्यांनी धोनीला बऱ्याचदा टीकेचं धनी केलं आहे. याआधी त्यांनी धोनीवर युवराजला संघाबाहेर ठेवल्याचा आरोप केला होता. तसंच अंबाती रायडूच्या निवृत्तीचं खापर देखील धोनीवरच फोडलं होतं. पण यंदाचे धोनीवरील त्यांचे वक्तव्य हा मोठा बदल आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विश्वचषकमध्ये टीम इंडिया सेमीफायनलमधून झाल्यानंतर धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु झाली. पण या ३८ वर्षीय खेळाडूने याबाबत कोणतेही संकेत दिले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif