IPL Auction 2021: अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स मध्ये सामील झाल्यानंतर बहीण सारा म्हणाली, 'तुझा अभिमान आहे'
साराने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर अर्जुनबरोबरचा एक फोटो शेअर केला असून त्यांच्यासाठी अभिनंदन संदेशही लिहिला आहे.
IPL Auction 2021: दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) च्या क्रिकेट कारकीर्दीला गुरुवारी मोठी बळकटी मिळाली. चेन्नईमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) मुंबई इंडियन्सने त्याला 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर सचिन आता मेंटरची भूमिका साकारत आहे आणि त्याच फ्रेंचायझीने अर्जुनला 20 लाखांच्या बेस प्राइसवर विकत घेतलं आहे. हा निर्णय तसा आश्चर्यकारक नाही. कारण अर्जुन गेल्या दोन ते तीन हंगामात या फ्रँचायझीसाठी नेट बॉलरची भूमिका साकारत होता.
अर्जुन तेंडुलकरच्या या कर्तृत्वावर त्याची बहीण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) ने सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे. साराने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर अर्जुनबरोबरचा एक फोटो शेअर केला असून त्यांच्यासाठी अभिनंदन संदेशही लिहिला आहे. साराने अर्जुनचे अभिनंदन करताना लिहिलं आहे की, 'हे यश तुझ्यापासून कुणीही हिरावू शकत नाही. हे यश तुझं आहे. तुझा अभिमान आहे.' (वाचा - IPL Auction 2021: SRH च्या आयपीएल टेबलवर कोण आहे मिस्ट्री गर्ल Kaviya Maran, नेटकरी म्हणाले- 'नॅशनल क्रश')
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने नुकत्याच हरियाणाविरूद्ध राष्ट्रीय टी -20 चॅम्पियनशिप सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले. अर्जुनने यापूर्वी वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या युवा क्रिकेटपटूने नुकत्याचं पार पडलेल्या प्रतिष्ठित पोलिस शिल्ड स्पर्धेत आपला प्रभावित दाखवला होता. श्रीलंका दौर्यावर अर्जुनने भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.