Afghanistan vs South Africa 3rd ODI Pitch And Weather Report: तिसऱ्या वनडेत रशीद खान करणार कहर की दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गाजवणार वर्चस्व; जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामान परिस्थिती

AFG vs SA: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे.

Afghanistan vs South Africa 3rd ODI Pitch And Weather Report: तिसऱ्या वनडेत रशीद खान करणार कहर की दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गाजवणार वर्चस्व; जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामान परिस्थिती
AFG vs A (Photo Credit - X)

Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 5.30 वाजता सुरु होईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानची कमान हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे.

खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत?

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामनाही शारजाहमध्ये खेळवला जाणार आहे. शारजाच्या मैदानावर खूप धावा केल्या जातात. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 211 धावांची आहे तर दुसऱ्या डावाची सरासरी 191 धावांची आहे. या मैदानावर 251 सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट्सवर 364 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. या मैदानावर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा दिग्गज गोलंदाज राशिद खानने धुमाकूळ घातला.

हे देखील वाचा: Afghanistan vs South Africa 3rd ODI Live Streaming: अफगाणिस्तान 'क्लीन स्वीप' करणार की दक्षिण आफ्रिका लाज राखणार? शेवटचा वनडे सामना 'इथं' पाहू शकता लाइव्ह

हवामान परिस्थिती

हा सामना शारजाहमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता खेळवला जाईल. या काळात तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. रात्री तापमान 30 अंशांपर्यंत खाली येऊ शकते. कडाक्याच्या उन्हात पावसाची शक्यता नाही. सामन्यादरम्यान आर्द्रता 55 ते 62 टक्के असू शकते. दोन्ही संघांच्या खेळाडूंना उन्हात खेळणे सोपे जाणार नाही.

दोन्ही संघांचे खेळाडू

अफगाणिस्तान संघ

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अब्दुल मलिक, रियाझ हसन, दरविश रसौली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, नांग्याल खरोती, अल्लाह मोहम्मद गझनफर, फजल हक फारुकी, बिलाल सामी, नवीद झदरन आणि फरीद अहमद मलिक.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, नाकाबायोमझी पीटर, अँडिले सिमेलेन, ट्राय सिमेलेन, जेस्टन, ट्राय, जॉर्न काइल व्हेरीन, लिझाद विल्यम्स.

 

(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2024 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).