Afghanistan vs Bangladesh, 2nd ODI Match 1st Inning Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानला दिले 253 धावांचे लक्ष्य, कर्णधार नझमुल हुसैन शांतोची 77 धावांची शानदार खेळी
बांगलादेश संघाने 50 षटकांत सात गडी गमावून 252 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 77 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान नझमुल हुसेन शांतोने 119 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नजमुल हुसेन शांतोशिवाय सौम्या सरकारने 35 धावा केल्या.
Afghanistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd ODI 2024 1st Inning Scorecard: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील (Sharjah) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळला जात आहे. अफगाणिस्तानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 92 धावांनी पराभव केला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदीच्या (Hashmatullah Shahidi) खांद्यावर आहे. तर बांगलादेशची (Bangladesh) कमान नजमुल हुसेन शांतोकडे (Najmul Hossain Shanto) आहे. (हेही वाचा - IND vs SA 2nd T20I Live Streaming: दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यात पुन्हा रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या, थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद )
दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 28 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला.
Bangladesh post a fighting total#AFGvBAN #Minister pic.twitter.com/nIu7xIn4PX
— bdcrictime.com (@BDCricTime) November 9, 2024
बांगलादेश संघाने 50 षटकांत सात गडी गमावून 252 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 77 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान नझमुल हुसेन शांतोने 119 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नजमुल हुसेन शांतोशिवाय सौम्या सरकारने 35 धावा केल्या.
अल्लाह गझनफरने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून नांगेलिया खरोटेने सर्वाधिक तीन बळी घेतले. नांगेलिया खरोटेशिवाय अल्लाह गझनफर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 253 धावा करायच्या आहेत. बांगलादेश संघ हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधू इच्छितो
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2024 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

