अफगाणिस्तान क्रिकेट खेळाडू मोहम्मद शहजाद याला बोर्डाने केले निलंबन, हे आहे कारण
आचार संहितेचे उल्लंघन केल्यामुळे शहजाद याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) खेळाडू मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) याच्यावर काही काळासाठी बंदी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. आचार संहितेचे उल्लंघन केल्यामुळे शहजाद याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहजाद याने देशाच्या बाहेर जाऊन खेळण्यासाठी प्रथम क्रिकेट बोर्डाकडून परवानगी घेतली नव्हती. बोर्डाच्या नियमानुसार, देशाबाहेर जाण्यासाठी कोणत्याही खेळाडूला बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र शहजाद याच्याकडून काही नियमांचे वारंवार उल्लंघन केले आहे.
शहजाद याने नियमांचे उल्लंघन केले आहे ही त्याची पहिली वेळ नाही आहे. 2018 मध्ये त्याने टूर्नामेंट खेळण्यासाठी बोर्डाच्या आचार संहितेचे उल्लंघन केले होते. त्याचसोबत वर्ल्डकप 2019 दरम्यान अनुशासनात्मक प्रकरणासंबंधित त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच 20 आणि 25 जुलै रोजी ठेवण्यात आलेल्या अनुशासन समिती बैठकीलासुद्धा उपस्थित राहीला नाही.('तू कुरूप आहेसं' म्हणत चाहत्याने जोफ्रा आर्चर याला केले ट्रोल, इंग्लंड गोलंदाजाने Twitter वर शानदार प्रत्युत्तर देत केली बोलती बंद)
बोर्डाने असे म्हटले आहे की, शहजाद याने वारंवार नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरोधात एक बैठक घेण्यात येणार आहे. वर्ल्डकप सामन्यापूर्वी शहजाद याने अफगाणिस्तानकडून दोन सामने खेळला. मात्र घुडख्याला दुखापत झाल्याने त्याला संघातून बाहेर करण्यात आले.
मोहम्मद शहजाद काबुल येथून परत आल्यावर मीडियाला असे म्हटले की, त्याला चुकीच्या पद्धतीने तो खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे घोषित करण्यात आले. जर त्यांना मला खेळण्याची संधी द्यायची नसल्यास मी क्रिकेट सोडून देईन असे सुद्धा शहजाद याने म्हटले आहे. शहजाद याने अफगाणिस्तान संघासाठी 84 वनडे, 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 2 टेस्ट मॅच खेळला आहे.