T20 World Cup AFG Vs NZ: अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा केला एकतर्फी पराभव, अनेक विक्रमांना गवसणी; ऐतिहासिक ठरला विजय

अफगाणिस्तानने हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावांवर गारद झाला आणि राशिद खानच्या संघाने हा सामना 84 धावांनी जिंकला.

AFG Team (Photo Credit - X)

T20 World Cup AFG Vs NZ: टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) आज अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड (AFG vs NZ) यांच्यात सामना रंगला. न्यूझीलंडचा हा पहिलाच सामना होता आणि पहिल्याच सामन्यात संघाला अफगाणिस्तानकडून (AFG Beat NZ) पराभवाला सामोरे जावे लागले होते. अफगाणिस्तानने हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावांवर गारद झाला आणि राशिद खानच्या संघाने हा सामना 84 धावांनी जिंकला. या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आणि हा विजय अफगाणिस्तानसाठी ऐतिहासिक विजय ठरला. (हे देखील वाचा: IND vs PAK T20 WC 2024 Live Streaming: भारत-पाकिस्तान सामना विनामूल्य कधी, कुठे आणि कसा पाहणार? येथे वाचा संपूर्ण तपशील)

अफगाणिस्तानचा टी-20 विश्वचषकातील तिसरा मोठा विजय

1. स्कॉटलंडला 130 धावांनी हरवले (वर्ष 2021)

2. युगांडाचा 125 धावांनी पराभव (2024)

3. न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला (वर्ष 2024)

4. नामिबियाचा 62 धावांनी पराभव (वर्ष 2021)

टी-20 विश्वचषकात एका डावात 4-4 विकेट घेणारे 2 गोलंदाज

न्यूझीलंडसोबत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानची गोलंदाजी उत्कृष्ट होती. अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना रशीद खान आणि फझलक फारुकी यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. यापूर्वी, 2021 मध्ये रशीद खान आणि मुजीब उर रहमान या जोडीने अफगाणिस्तानसाठी ही कामगिरी केली होती.

टी-20 विश्वचषकातील कर्णधाराची सर्वोत्तम गोलंदाजी

राशिद खान या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध रशीदने अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात गोलंदाजी करताना राशिदने 4 षटकात 17 धावा देत 4 बळी घेतले. T20 विश्वचषकात कर्णधाराची सर्वोत्तम गोलंदाजी करणारा रशीद खान आता तिसरा कर्णधार बनला आहे.

1. झीशान मकसूद (20/4)- वर्ष 2021

2. डॅनियल व्हिटोरी (20/4) – वर्ष 2007

3. राशिद खान (17/4) – वर्ष 2024



संबंधित बातम्या