एबी डी विलियर्स ने दोन वर्षांनंतर निवृत्तीच्या निर्णयावर केला खुलासा, टी-20 वर्ल्ड कप कमबॅकवर केले 'हे' विधान

निवृत्तीतून बाहेर येत टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याबाबतचे अनुमान संपविण्यास नकार देताना दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने म्हटले की सध्या त्याचे संपूर्ण लक्ष सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी आवृत्तीवर आहे.

एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Getty Images)

निवृत्तीतून बाहेर येत टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत खेळण्याबाबतचे अनुमान संपविण्यास नकार देताना दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डी विलियर्सने (AB de Villiers) म्हटले की सध्या त्याचे संपूर्ण लक्ष सध्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या आगामी आवृत्तीवर आहे. आयपीएलची (IPL) 13 वी आवृत्ती 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. 2018 मध्ये सर्वांना धक्का देत डी विलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, पण 2019 मध्ये त्याने आयसीसी विश्वचषकसाठी स्वत:ला संघात निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघात त्याचा समावेश झाला नव्हता तथापि, ऑस्ट्रेलियामधील यावर्षीच्या आयसीसी टी-20 विश्वचषकात 'मिस्टर 360 डिग्री' दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत पुन्हा एकदा दिसेल असा अहवाल प्रसारित होऊ लागला आहे. (कोरोना व्हायरसमुळे टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर संकट? COVID-19 च्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रमुखांनी केले 'हे' मोठे विधान)

“थांबू आणि काय होते ते पाहूया,” डीव्हिलियर्सने स्पोर्ट्सटारला म्हटले आहे. “माझे लक्ष याक्षणी इंडियन प्रीमियर लीगवर आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आमच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करण्यास मदत करीत आहे.मग आम्ही बसून उर्वरित वर्षाकडे पाहू आणि काय शक्य आहे ते पाहू,” तो पुढे म्हणाला. आफ्रिकेचा माजी विकेटकीपर-फलंदाज मार्क बाउचर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून डी विलियर्सच्या पुनरागमन करण्याच्या बातम्या तीव्र झाल्या आहेत. निवृत्तीबद्दल डी विलियर्स म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या परिस्थितीचा विचार करून स्वत: चा निर्णय घेतला पाहिजे. मी अशा ठिकाणी पोहोचलो जिथे मला माझी बायको आणि दोन तरुण मुलांसोबत वेळ घालवायचा होता आणि कौटुंबिक आणि क्रिकेट यांच्यात वाजवी संतुलन मिळवायचा होत. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक मागणी या दिवसांत मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु प्रत्येक खेळाडूने तो काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे निश्चित केले पाहिजे, '' असे त्यांनी नमूद केले.

बाऊचरने यापूर्वी सांगितले होते की जर डी विलियर्स चांगल्या फॉर्मात असेल आणि या स्पर्धेसाठी स्वत: उपलब्ध असेल तर त्याचा टी-20 विश्वचषकसाठी विचार केला जाऊ शकतो. मात्र, एबीच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की 36 वर्षीय ज्येष्ठ खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची सध्या घाई नाही. 23 मे 2018 रोजी एबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एबीचा हा निर्णय प्रत्येकासाठी धक्कादायक होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement