आंतरराष्ट्रीय निवृत्तीपूर्वी ‘या’ 5 दिग्गज क्रिकेटपटूंना नाही मिळाला निरोप सामना, दोन वर्ल्ड कप विजेता कर्णधाराचाही यादीत समावेश

हे दिग्गज खेळाडू निरोप सामन्यासाठी पात्र असतात, तथापि जेव्हा ते निवृत्तीची घोषणा करतात तेव्हा बर्‍याच वेळा त्यांना निरोप सामना खेळण्याची संधी मिळत नाही.

एमएस धोनी आणि केविन पीटरसन (Photo Credit: Facebook)

Cricketers Who Didn’t Receive A Farewell Match: क्रिकेटच्या खेळात अव्वल स्थान गाठणे हा एक कठीण प्रवास असतो. एखाद्या क्रिकेटपटूला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी बर्‍याच वर्षांपासून संघर्ष आणि सराव करावा लागतो. राष्ट्रीय संघात स्थान मिळवल्यानंतर खेळाडूला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये झळकण्यासाठी आणि ते स्थान टिकून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागते. जेव्हा खेळाडू त्यांच्या देशासाठी दीर्घ कालावधीत मोठी भूमिका निभावतात तेव्हा त्यांना दिग्गज क्रिकेटपटू असे संबोधले जाते. तथापि, राष्ट्रीय संघात एक महत्त्वाचा दर्जा मिळाल्यानंतरही संघात उपस्थिती कायम राखण्यासाठी खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. जेव्हा दिग्गज खेळाडू बॅट किंवा बॉलने कामगिरी करण्यास संघर्ष करतात तेव्हा निवडकर्त्यांना त्यांना संघातून वगळण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागतो. हे दिग्गज खेळाडू निरोप सामन्यासाठी पात्र असतात, तथापि जेव्हा ते निवृत्तीची घोषणा करतात तेव्हा बर्‍याच वेळा त्यांना निरोप सामना खेळण्याची संधी मिळत नाही. (हे 5 महान कर्णधार आपल्या कारकिर्दीत नाही उंचावू शकले ICC ट्रॉफी, यादीत एक भारतीय दिग्गजाचाही समावेश)

1. युवराज सिंह (Yuvraj Singh)

युवराज सिंह भारतीय क्रिकेटमधील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. युवीने टी-20 विश्वचषक 2007 आणि 2011 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या विजेतेपदाच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली होती. 2017 मध्ये युवराजने इंग्लंडविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला जो की टी-20 सामना होता. त्याने 10 चेंडूंत 27 धावा केल्या. मात्र, पुढील दोन वर्षे त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेरीस जून 2019 मध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

2. मॅथ्यू हेडन (Matthew Hayden)

हेडन ऑस्ट्रेलियाचा एक मजबूत आणि आक्रमक सलामीवीर फलंदाज होता. 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वनडे विश्वचषक विजयात त्याने मोठी भूमिका बजावली होती. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरील मालिकेत खराब कामगिरीनंतर जानेवारी 2019 मध्ये हेडनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी हेडनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून वगळण्यात आले होते.

3. केविन पीटरसन (Kevin Pietersen)

पीटरसन हा इंग्लंडकडून खेळणारा आक्रमक फलंदाज होता. पीटरसनने इंग्लंडकडून 136 एकदिवसीय आणि 104 कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 4440 आणि 8181 धावा केल्या. पीटरसन कसोटीत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज आहे. 2013-14 मध्ये इंग्लंडने 5-0 अशी अ‍ॅशेस मालिका गमावली. पाच सामन्यात दोन अर्धशतकांसह 294 धावांचा चांगला विक्रम नोंदवूनही पीटरसन निवड समितीच्या रडारवर आला. मालिकेनंतर पीटरसनला कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही आणि अखेर त्याने मार्च 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

4. एमएस धोनी (MS Dhoni)

धोनी हा भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार आहे. 2007 आयसीसी टी-20 वर्ल्ड, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात धोनीने संघाचे नेतृत्व केले होते. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयसीसी वनडे विश्वचषक 2019 दरम्यान खेळला. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनीचा समावेश होण्याची अपेक्षा होती. तथापि, कोविड-19 मुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि एका सोशल मीडिया पोस्टमध्ये धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

5. एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers)

डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. “माझी वेळ आली आहे आणि खरे सांगायचे झाले तर मी थकलो आहे,” असे सांगत आपला निर्णय जाहीर करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या निवृत्तीची घोषणा क्रिकेट चाहत्यांसाठी मोठे धक्कादायक ठरले. विलियर्स एक आक्रमक फलंदाज होता आणि वेगवान अर्धशतक (16 चेंडू) आणि शतक (31 चेंडूत) नोंदवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif