Mohammed Siraj च्या नावावर मोठी कामगिरी, 2022 मध्ये भारतासाठी ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ठरला गोलंदाज
मोहम्मद सिराजने 14 व्या सामन्यात हा पराक्रम केला. मोहम्मद सिराजने यावर्षी 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत, तर युजवेंद्र चहलने 14 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.
Mohammed Siraj Most Wicket 2022: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आपल्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवली. दुसऱ्या षटकात अनामूल हकची विकेट घेताच सिराज 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. मोहम्मद सिराजने युझवेंद्र चहलला मागे टाकले. मोहम्मद सिराजने 14 व्या सामन्यात हा पराक्रम केला. मोहम्मद सिराजने यावर्षी 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत, तर युजवेंद्र चहलने 14 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहल बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग नाही, अशा परिस्थितीत हा विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर यंदाही राहू शकतो.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले. त्याने 10 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 32 धावा दिल्या होत्या आणि अनामूल हक, मुशफिकर रहीम आणि हसन महमूद यांना आपला बळी बनवले होते. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd ODI Live Update: उमरान मलिकचा भेदक मारा; 151 किमी प्रतितास वेगाने नजमुल हसनला केले क्लीन बोल्ड (Watch Video)
28 वर्षीय मोहम्मद सिराजने यंदा चमकदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना खूप त्रास दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले.